PCMC Bharti 2023 | पिंपरी चिंचवड महापालिकेत ३८६ जागांसाठी २६, २७ व २८ मे ला परीक्षा

HomeपुणेBreaking News

PCMC Bharti 2023 | पिंपरी चिंचवड महापालिकेत ३८६ जागांसाठी २६, २७ व २८ मे ला परीक्षा

Ganesh Kumar Mule May 23, 2023 4:26 PM

PCMC : Chanda Lokhande : पिंपरीच्या भाजपच्या नगरसेविका चंदाताई लोखंडे यांचा भाजपला रामराम;  राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत
Illegal Construction Circular | राज्यातील सर्व महापालिकामध्ये अनधिकृत बांधकामावर शास्ती माफ करण्यात यावी | घनश्याम निम्हण
Pune Hoardings News | अनधिकृत होर्डिंग वरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक

PCMC Bharti 2023 | पिंपरी चिंचवड महापालिकेत ३८६ जागांसाठी २६, २७ व २८ मे ला परीक्षा

PCMC Bharti 2023 | पिंपरी चिंचवड महापालिकेत (Pimari – Chinchwad Municipal Corporation) विभिन्न विभागात ३८६ पदासाठी भरती (PCMC Recruitment) करण्यात येणार आहे. राज्य सरकारने नोकर भरतीवरील निर्बंध उठविल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांतील ‘ब’ आणि ‘क’ गटातील १५ पदांच्या ३८६ जागांसाठी २६, २७ व २८ मे ला परीक्षा (PCMC Recruitment Exam) होणार आहे. ही परीक्षा राज्यातील २६ शहरातील ९८ केंद्रांवर होणार आहे. त्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. (PCMC Bharti 2023)

  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpari – Chinchwad Municipal Corporation) स्थायी आस्थापनेवरील गट ‘ब’ व गट क’ संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात होते.  (Pimari -Chinhwad mahanagarpalik Bharti 2023)
पालिकेने अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्रिशमन अधिकारी, विभागीय अग्रिशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, न्यायालय लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत) या संवर्गासाठी रिक्त असलेल्या ३८६ जागांसाठी अर्ज मागविले होते. राज्यभरातून ८५ हजार ७७१ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. २६ मे रोजी एका सत्रामध्ये, २७ मे रोजी तीन सत्रामध्ये तर २८ मे रोजी तीन सत्रामध्ये परीक्षा होणार आहे. (Pimari – Chinhwad Municipal Corporation)
राज्यभरातील २६ शहरातील ९८ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यासाठी महापालिकेने सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, सह शहर अभियंता यांच्यासह तब्बल ९८ वरिष्ठ अधिकाऱ्यांची परीक्षा केंद्रावर निरीक्षकांच्या नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक परिक्षा केंद्रावर मोबाइल जॅमर लावण्यात आले आहे. तसेच केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही, स्कॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस आयुक्तांना आवश्‍यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार दिव्यांगाकरिता आवश्‍यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

या पदांसाठी भरती

अतिरिक्त कायदा सल्लागार – 1
विधी अधिकारी  – 1
उप मुख्य अग्निशमन अधिकारी – 1
विभागीय अग्निशमन अधिकारी – 1
उद्यान अधीक्षक (वृक्ष)  – 1
सहाय्यक उद्यान अधीक्षक – 2
उद्यान निरीक्षक – 4
हॉटीकल्चर सुपरवायझर – 8
कोर्ट लिपिक – 2
अॅनिमल किपर – 2
समाजसेवक – 3
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 41
लिपिक – 213
आरोग्य निरीक्षक – 13
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 75
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 18
News Title | PCMC Bharti 2023 | Examination for 386 seats in Pimpri Chinchwad Municipal Corporation on May 26, 27 and 28