Pavneet Kaur IAS | किटक प्रतिबंधक विभागातील १०० कर्मचाऱ्यांना घाणभत्ता, धुलाई भत्ता व वारस हक्क लागू करण्याचे अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश | अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांचे परिपत्रक जारी

Homeadministrative

Pavneet Kaur IAS | किटक प्रतिबंधक विभागातील १०० कर्मचाऱ्यांना घाणभत्ता, धुलाई भत्ता व वारस हक्क लागू करण्याचे अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश | अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांचे परिपत्रक जारी

Ganesh Kumar Mule Nov 12, 2025 9:05 PM

Ghanbhatta Varas Hakka Case | घाणभत्ता वारस हक्काची  सुनावणी पुन्हा लांबणीवर! |  नवीन सुनावणी आता 6 मे  ला
Ghanbhatta Varas Hakka Case | घाणभत्ता वारस हक्काची  केस अजून बोर्डावर नाही |  नवीन सुनावणी आता 21 जून ला
Ghanbhatta Varas Hakka Case | घाणभत्ता वारस हक्काची सुनावणी औरंगाबाद बेंचसमोर आता 12 फेब्रुवारी  ला

Pavneet Kaur IAS | किटक प्रतिबंधक विभागातील १०० कर्मचाऱ्यांना घाणभत्ता, धुलाई भत्ता व वारस हक्क लागू करण्याचे अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश | अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांचे परिपत्रक जारी

 

PMC Health Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याकडील किटक प्रतिबंधक विभाग व नागरी हिवताप विभागाकडील वर्ग-४ मधील सेवकांना घाणभत्ता, धुलाई भत्ता व वारस हक्क लागू करणेत आला आहे. सरकारच्या नगर विकास विभागाने याबाबत निर्णय जारी केला आहे. त्यानुसार यावर अमल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पवनीत कौर यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार १०० कर्मचाऱ्यांना याच लाभ मिळणार आहे.   (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील वर्ग-४ मधील किटक प्रतिबंध विभाग व नागरी हिवताप विभागाकडील फिल्डवर्कर व सायनोगेसिंग बिगारी (डीस इन्फेक्शन बिगारी + बिगारी निर्जंतुकीकरण) या पदाचे कामाचे स्वरूप पाहता सदर सेवकांना घाणभत्ता, धुलाईभत्ता व वारसा हक्क लागू करण्याबाबत आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी शासनास प्रस्ताव पाठवला होता. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील सदर कर्मचान्यांना घाणभत्ता, धुलाईभत्ता व वारसा हक्क लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन निर्णय लागू करण्यात आला आहे. (PMC Ghanbhatta, Varas Hakka)

अतिरिक्त आयुक्त यांच्या परिपत्रका नुसार आरोग्य विभागाकडील फिल्डवर्कर संख्या शेड्युलमान्य पदे अस्तित्वात आहेत. त्या पैकी आजमितीस ५७ फिल्ड वर्कर व ४३ बिगारी निर्जंतुकीकरण (डिस इन्फेकट बिगारी + सायनोगॅसिंग बिगारी ) प्रत्यक्ष कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना ०१.०७.२०२५ पासून घा ३३०, बिगारी निर्जंतुकीकरण (डिसइन्फेकट बिगारी + सायनोगेंसिंग बिगारी) संख्या – १०४ या नामाविधानाची घाणभत्ता व धुलाई भत्ता प्रत्यक्ष वेतनामध्ये अदा करण्यात यावा. घाणभत्ता व धुलाई भत्ता लागू झाल्याची नोंद संबंधित कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकात करण्यात यावी. जे फिल्डवर्कर, बिगारी निर्जंतुकीकरण (डिसइन्फेक्ट बिगारी + सायनोगॅसिंग बिगारी ) हे  ०१.०१.२००६ पासून ते प्रकरणपरत्वे आजमितीस वयोपरत्वे सेवानिवृत्त अथवा निधन पावले आहेत अथवा तद्संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकात संबंधितांना घाणभत्ता व धुलाईभत्ता संभाव्य प्रभावाने (prospective effect) लागू करण्यात येत असून त्या बाबतची विशेष नोंद संबंधित सेवकाच्या सेवा पुस्तकात करून घेण्याची दक्षता ही आरोग्य अधिकारी यांनी घ्यावी.  ज्या सेवानिवृत्त अथवा निधन पावलेल्या कर्मचाऱ्याचे वारस लाड – पागे समिती व घाणभत्ता नियुक्ती याबाबत अस्तित्वात असलेल्या शासन निकषानुसार पात्र ठरतील अशा वारस प्रकरणांची छाननी आरोग्य अधिकारी यांनी काटेकोरपणे करून नियुक्ती द्यावयाच्या वर्षाचे परिपूर्ण प्रस्ताव सक्षम प्राधिकाच्यापुढे मान्यतेस सादर करण्याची कृती करावयाची आहे.  अनुकंपा / घाणभत्ता प्रकरणासाठी लागणारे आवश्यक ते कागदपत्रांबाबतच्या चेकलिस्टनुसार व शासन निर्णयातील तरतुदीनुसार आपले खातेस्तरावर तपासणी केल्याच्यानंतर संबंधित पात्र वारसांचे परिपूर्ण प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्यात यावेत. असे आदेशात म्हटले आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: