Participation of citizens in the budget | बजेट मध्ये नागरिकांचा सहभाग | ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले जाणार | 1 सप्टेंबर पर्यंत नागरिक देऊ शकतात कामे

HomeBreaking Newsपुणे

Participation of citizens in the budget | बजेट मध्ये नागरिकांचा सहभाग | ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले जाणार | 1 सप्टेंबर पर्यंत नागरिक देऊ शकतात कामे

Ganesh Kumar Mule Jul 30, 2022 10:40 AM

Savarkar Gaurav Yatra | भर पावसात कोथरुड मध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न
NCP Vs BJP | भाजपच्या ठेकेदारीराजने शहर खड्डेमय | राष्ट्रवादी काँग्रेस चा आरोप
PMC Pune Recruitment Second Phase | महापालिका भरती दुसरा टप्पा | दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी विधान भवनाचा अडसर! | रोस्टर तपासण्यात होतोय विलंब

बजेट मध्ये नागरिकांचा सहभाग | ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले जाणार

| 1 सप्टेंबर पर्यंत नागरिक देऊ शकतात कामे

पुणे |  सन २००६-०७ पासून महानगरपालिकेचे अंदाजपत्रक तयार करताना नागरिकांच्या सूचनेनुसार आवश्यक कामांचा अंतर्भाव अंदाजपत्रकात करणे असा उपक्रम पुणे शहरात करण्यात आला आहे. सदर उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाने विनामूल्य अर्ज उपलब्ध करून दिले जातात.  हे अर्ज नागरिकांना online पद्धतीने उपलब्ध करून देण्याची कार्यवाही माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत चालू आहे. दरम्यान नागरिक यासाठी 1 सप्टेंबर पर्यंत आपल्या प्रभागातील कामे सुचवू शकतात. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सन २०२३-२४ चे अंदाजपत्रक तयार करताना महापालिका सहाय्यक आयुक्त यांचे स्तरावर नागरिकांकडून त्यांच्या प्रभागात करावयाच्या कामांबाबतच्या सूचनांचा अंदाजपत्रकामध्ये समावेश करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपध्दतीचा व वेळापत्रकाचा अवलंब करण्यात यावा, असे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
१. प्रशासक तथा महापालिका आयुक्त (प्रभाग समिती अध्यक्ष) यांचे अध्यक्षतेखाली प्रभाग समितीची बैठक प्रस्तुत प्रयोजनाचे विचारार्थ बोलविण्यात यावी, त्या बैठकीमध्ये नागरिकांच्या अंदाजपत्रक सहभागाबाबत चर्चा घडवून आणावी. नागरिकांच्या सहभागातून अंदाजपत्रक तयार करणेबाबतचा प्रारूप कार्य आराखडा तयार करण्यात यावा.
२. प्रभाग समितीने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार दैनिक वृत्तपत्रात जाहीर आवाहन करून नागरिकांकडून कामाचे प्रस्ताव दि.०१/०९/२०२२ अखेर मागविण्यात यावे.
३. प्रभागामध्ये तीन सदस्यांचा प्रभाग असल्यास त्या प्रभागास कमाल रक्कम रुपये ७५ लाख तसेच २ सदस्यांचा प्रभाग असल्यास कमाल रक्कम रुपये ५० लाखाची मर्यादा ठेवावी. तसेच एका कामाची रक्कम रुपये ५ लाखापेक्षा जास्त नसावी.
४. नागरिकांकडून आलेले प्रस्ताव मा. प्रभाग समितीकडे अंतिमतः प्राधान्यक्रम ठरविणे व मान्यतेसाठी पाठविण्यात यावे.
५. मा. प्रभाग समितीच्या मान्यतेनंतर महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी त्यांचे नियंत्रणाखालील सर्व प्रभागाची एकवट माहिती, नियतकालिक अर्थसंकल्प विचारार्थ महापालिका आयुक्त यांचेकडे विहित
नमुन्यात दि. १०/१०/२०२२ पर्यंत सादर करावी.