Palkhi Sohala 2023 | PMPML Pune | पालखी सोहळ्यानिमित्त ‘पीएमपीएमएल’कडून जादा बसेसचे नियोजन

HomeBreaking Newsपुणे

Palkhi Sohala 2023 | PMPML Pune | पालखी सोहळ्यानिमित्त ‘पीएमपीएमएल’कडून जादा बसेसचे नियोजन

Ganesh Kumar Mule Jun 07, 2023 5:00 PM

Palkhi Sohala 2023 | पालखी मुक्काम कालावधीत पुणे महापालिका 3093 पोर्टेबल स्वच्छतागृह पुरवणार 
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala | टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
Aarogyawari | Palkhi Sohala | वारीतील महिलांसाठी ‘१०९१’ टोल फ्री क्रमांक

Palkhi Sohala 2023 | PMPML Pune | पालखी सोहळ्यानिमित्त ‘पीएमपीएमएल’कडून जादा बसेसचे नियोजन

Palkhi Sohala | 2023 | PMPML Pune | संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त प्रस्थान सोहळ्यास (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) पुणे शहर/उपनगरे व संपूर्ण राज्यभरातून आळंदी व देहू येथे उपस्थित राहणाऱ्या असंख्य भाविक नागरिकांचे वाहतुकीची व्यवस्था नेहमीच्या बसेसशिवाय जादा बसेस देवून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात येत आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Palkhi Sohala 2023 | PMPML Pune)

भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी दिनांक ०८/०६/२०२३पासून दिनांक १२/०६/२०२३ पर्यंत आळंदी करिता स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून सद्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा प्रतिदिनी एकुण १४२ बसेस संचलनात राहणार आहेत. दिनांक ११/०६/२०२३ रोजी रात्रौ १२:०० वा. पर्यंत आळंदी करिता बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय देहूकरिता पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून सद्याच्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा एकुण ३०बसेस महामंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा १२बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Palkhi Sohala 2023 | PMPML Pune)

​दिनांक १२/०६/२०२३ रोजी पालखी प्रस्थान आळंदीमधून होत असल्यामुळे पहाटे ०२:३० वा. पासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणावरूनआळंदीला जाणेकरिता जादा १८ बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. (Pune Traffic Update)

​या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणाऱ्या बसेस सकाळी ०५:३० वाजले पासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बस स्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील ११३बसेस आळंदीसाठी भोसरी व विश्रांतवाडी पर्यंत भाविकांच्या सेवेसाठी संचलनात राहणार आहेत. याशिवाय जादा बसेसची व्यवस्था ही प्रवाशांच्या गरजेनुसार (प्रवासी संख्या किमान ४० आवश्यक) देण्यात येईल. (PMPML PUNE NEWS)

तसेच पुण्याहून पालख्या प्रस्थानाच्या वेळेस दिनांक १४/०६/२०२३ रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी १२:०० ते ०१:०० दरम्यान थांबणार असल्याने अशा वेळेस महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इ. ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (Palkhi Sohala 2023 News)

 

तद्दनंतर पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर व सासवड रोडने मार्गस्थ होईल. अशा वेळी सोलापूर/उरूळीकांचन मार्ग जसा जसा वाहतुकीसाठी खुला होईल तसतशी बसवाहतुक चालू ठेवण्यात येईल.

​हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पुर्णत: बंद राहणार आहे. तथापि, प्रवासी/भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी म्हणून सदर मार्गांची बसवाहतुक पर्यायी मार्गाने म्हणजेच दिवेघाट ऐवजी बोपदेव घाट मार्गे अशी चालू ठेवण्यात येणार असून सदर बसेसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून अशा ६० जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.

​तरी सदर बस वाहतुकीबाबतची नोंद सर्व संबंधित भाविक व इतर प्रवासी नागरिकांनी घेवुन त्याचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

—-

News Title | Palkhi Sohala 2023 | PMPML Pune | Planning of extra buses by ‘PMPML’ on the occasion of Palkhi festival