Pahalgam Terror Attack | पुणे शहरातील सर्वच राजकीय पक्षांकडून निषेध व्यक्त
Pune News – (The Karbhari News Service) – जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे सामान्य पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलन करत आपला निषेध नोंदवला. तसेच श्रद्धांजली सभा देखील घेण्यात आली. (Pahalgam Terror News)
दहशतवादी हल्ल्या विरोधात भाजपाची निदर्शने
पहेल गाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज लोकमान्य टिळक चौकात (अलका टॉकीज) येथे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह दहशतवाद्यांना चोख उत्तर देतील, देशातील जनतेने एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे मत भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केले.
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेशाच्या चिटणीस वर्षा डहाळे पहालगाम येथे मृत्यू मुखी पडलेल्या कै.कौस्तुभ गनबोटे यांच्या भगिनी श्रीमती अर्चना देवधर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जावडेकर म्हणाले, काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर, तेथील पर्यटनाला मोठी चालना मिळाली होती. त्यामुळे तेथील अर्थव्यवस्था सुधारत होती. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला आणि विकासाला खिळ बसावी या उद्देशाने हा भ्याड हल्ला केला. त्याला चोख उत्तर दिले जाईल.
यावेळी पुणे शहरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——
पुणे शहर शिवसेना वतीने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा तीव्र निषेध, दहशतवाद्यांना स्वारगेट चौकात प्रतीकात्मक फाशी देऊन आंदोलन..!!
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात पाकिस्तान धार्जिण्या अतिरेक्यांनी पर्यटकांवर धर्म विचारून केलेल्या भ्याड हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ पुणे शहर शिवसेनेच्यावतीने आज स्वारगेट चौकात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.
या निषेध आंदोलनात पाकिस्तानच्या दहशतवादी प्रवृत्तीचा निषेध करत त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली. ‘दहशतवाद असाच संपविला जातो!’ असा ठाम संदेश शिवसेनेच्यावतीने जनतेसमोर मांडण्यात आला.
शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “हा हल्ला फक्त भारतातील काही पर्यटकांवर नव्हे, तर भारतीय माणुसकीवर झालेला घात आहे. आम्ही आज शांत बसणार नाही. पाकिस्तान आणि त्यांच्या सहकार्यांना, जे धर्माच्या नावावर निर्दोष लोकांवर हल्ले करतात, त्यांना कडक उत्तर दिलं जाईल. या भ्याड कृत्याचा बदला पाकिस्तानच्या हद्दीतच घेतला जाईल!”
शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी व इतर अंगिकृत संघटनांचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. स्वारगेट चौकात आंदोलनावेळी घोषणाबाजी, देशभक्तीपर नारे, आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता.
शिवसेनेने केंद्र सरकारकडे अशी मागणी केली की, “या हल्ल्याचा योग्य आणि ठोस बदला घेतला जावा, आणि भविष्यात अशा दहशतवादी हल्ल्यांना आळा बसावा यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली जावी.”
या आंदोलनाच्या निमित्ताने पुणेकरांनी शिवसेनेच्या या देशभक्तीपर पवित्र्याला जोरदार प्रतिसाद दिला आणि दहशतवादाच्या विरोधात एकजूट दर्शविली. यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, उपजिल्हाप्रमुख अमर घुले,पंकज कोद्रे,सुदर्शना त्रिगुणाईत,आनंद गोयल, लक्ष्मण आरडे,सुनील जाधव, सुधीर कुरुमकर,विकी माने,गौरव साईनकर,विकास भांबुरे,दत्ता खवळे,नवनाथ निवंगुणे,अभिजीत बोराटे, गणेश काची,शंकर संगम,संदीप शिंदे,दीपक कुलाळ,आकाश रेणुसे, सुरेखा पाटील,महेंद्र जोशी,निलेश जगताप,तुषार मरळ,अक्षय तारु,उद्धव कांबळे, संदेश पावसकर,गडकरी सर,प्रशांत डाबी,नागेश अडसूळ,अकबर शेख, विशाल सरवदे, प्रणव थोरात, व असंख्य शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——–
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उबाठा पुणे आक्रमक
जम्मू काश्मीर पहलगाम या ठिकाणी भारतीय तसेच काही परदेशी पर्यटकांवर दहशत वाद्यांकडून हल्ला करण्यात आला, यामध्ये 28 हून अधिक नागरिक मृत पावले यात महाराष्ट्रातील ६ जणांना ही जीव गमवावा लागला. देशात पठाणकोट, उरी, पुलवामा, काल पहलगाम, यानंतरही कुणाला जर वाटत असेल की आपला देश सुरक्षित हातात आहे तर तो मोठा भ्रम आहे हे आता समोर आले आहे भारतातील नागरिक भारतात जर सुरक्षित नसतील आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना इथे येऊन सुरक्षित राहणार असतील तर अश्या असक्षम मोदी सरकारने तत्पर राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली .
यावेळी शिवसैनिकांनी घोषणा देताना देशाचे गृहमंत्री अमित शहा राजीनामा द्या “ ही आंदोलनात मागणी केली आणि निषेध नोंदवला .
यावेळी आंदोलनास शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, रामभाऊ पारिख, संघटक राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, मकरंद पेठकर, युवासेना शहर संघटक राम थरकुडे, उपशहर प्रमुख प्रशांत राणे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, विभाग प्रमुख अतुल दिघे, सूरज लोखंडे, चंदन साळुंके, अनिल माझिरे, जयदीप पडवळ, दिलीप पोमण, संतोष भुतकर, महिला आघाडीच्या निकिता मारतकर, विद्या होडे, अमृत पठारे, रोहिणी कोल्हाळ, वैशाली दारवटकर, पद्मा सोरटे, ज्योती चांदेरे, सलमा भाटकर, करुणा घाडगे, स्नेहल पाटोळे, विजया मोहिते, सोनाली जुनावणे, मृणमयी लिमये, रोहिणी मडोले, युवा सेनेचे युवराज पारिख, परेश खांडके, गणेश काकडे, सोहम जाधव, नीरज नांगरे, सोनू पाटील, गणेश घोलप, अंकित अहिरे, अक्षय हबीब, चिंतामण मुंगी, प्रसाद जठार, रोहित नलावडे, हेमंत धनवे, रमेश क्षीरसागर, सतीश गिरमे, मकरंद कळमकर, विजय रावडे, अनंत हुलवले, योगेश तापकीर, नितीन मोरे, मारुती वार्वे, संतोष तोंडे, निलेश वाघमारे, सनी गायकवाड, बकुळ धाकावे, रमेश परदेशी, इम्रान खान, हेमंत यादव, प्रकाश चवरे, सचिन घोलप, हरिभाऊ सपकाळ, संजय साळवी, आनंद बेंद्रे, सूरज खंडागले, प्रफुल्ल शिंदे, निरंजन कुळकर्णी, प्रवीण रणदिवे, गिरीश गायकवाड, सचिन मोहिते, राहुल शेडगे, पंकज परदेशी, अमित बाबर, संतोष होडे, प्रकाश कांबळे आणि नागरिक उपस्थित होते.
——-
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची श्रद्धांजली
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जवळपास २८ नागरिक मृत्युमुखी पडले. यात महाराष्ट्रातील ६ तर पुण्यातील २ नागरिकांचा समावेश आहे. या सर्व मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खासदार सौ. सुप्रिया सुळे व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत कात्रज येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह व दुर्दैवी आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व पर्यटकांच्या कुटुंबांच्या दुःखात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सहभागी आहे. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा आहे. पण, यासोबतच देशात धार्मिक सलोखा कायम राखण्यासाठीही प्रयत्न करावेत असे आवाहन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.
यावेळी युवक शहराध्यक्ष श्री. किशोर कांबळे, मा. नगरसेवक श्री. विशाल तांबे , स्वाती पोकले, काकासाहेब चव्हाण, स्मिता कोंधरे, यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
———
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे सामान्य पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध आंदोलन व श्रद्धांजली सभा.
जम्मू काश्मिर येथील पहलगाम मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची निर्घण हत्या केली आणि अनेक पर्यटक जखमी केले. नागरिकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण देश हदरला. अनेक पर्यटकांनी आपले नातेवाईक गमावले. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज झाशीची राणी पुतळा, बालगंधर्व चौक येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले.
यावेळी बोलताना पाकिस्तानच्या विरोधात अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘अतिशय नियोजनबध्द अतिरेक्यांतर्फे हा हल्ला करण्यात आलेला आहे. काश्मिर खोऱ्यामध्ये पुन्हा अतिरेक्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. ज्या ठिकाणी पर्यटक गेले होते तेथे सुरक्षा व्यवस्था नव्हती, याचाच फायदा अतिरेक्यांनी घेतला. पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यानी या हल्ल्यामागच्य सूत्रधारांवर कठोर कारवाई केली पाहिजे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहरातील जे पर्यटक व इतर पर्यटक या अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.’’
यानंतर उपस्थितांनी मेणबत्त्या पेटवून मृतांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, नगरसेवक रफिक शेख, अजित दरेकर, गोपाळ तिवारी, मुख्तार शेख, नीता रजपूत, राजेंद्र शिरसाट, मेहबुब नदाफ, नितीन परतानी, प्राची दुधाने, ॲड. राजश्री अडसूळ, स्वाती शिंदे, उषा राजगुरू, प्रियंका मधाळे, अनिता धिमधिमे, सुंदर ओव्हाळ, कांचन बालनायक, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, सोशल मिडीया अध्यक्ष गुलामहुसेन खान, इंटक अध्यक्ष चेतन आगरवाल, रवि पाटोळे, ब्लॉक अध्यक्ष राजू ठोंबरे, संतोष पाटोळे, अजित जाधव, रमेश सोनकांबळे, विशाल जाधव, रविंद्र माझीरे, हेमंत राजभोज, अक्षय माने, रमेश सकट, द. स. पोळेकर, गणेश गुगळे, राज जाधव, राजेंद्र भुतडा, सतिश पवार, ॲड. फैय्याज शेख, अविनाश अडसूळ, यासीन शेख, सचिन सावंत, अभिजीत महामुनी, सद्दाम शेख, हर्षद हांडे, वैभव डांगमाळी, लतेंद्र भिंगारे, मनोहर गाडेकर, कृष्णा सोनकांबळे, मंदा जाधव, कल्पना शंभरकर आदी उपस्थित होते.
COMMENTS