किरीट सोमय्यांच्या बंदोबस्ताचा फटका सामान्य पुणेकरांना
: सोमय्यांच्या महापालिका प्रवेशामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ
: कामे रखडली; पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी भवन मध्ये येण्यापासून रोखले
पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुणे महापालिका दौरा चांगलाच गाजला. भाजपने हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला होता. त्यामुळे सोमय्याच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यासाठी पोलीस आणि महापालिका सुरक्षा रक्षकांची कुमकच ठेवण्यात आली होती. मात्र या बंदोबस्ताचा फटका सामान्य पुणेकरांना बसला. सकाळपासूनच नागरिकांना महापालिकेत येण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे महत्वाची कामे असून देखील नागरिक ही कामे करू शकले नाहीत. याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
: जबाबदारी कोण स्वीकारणार?
गेल्या शनिवारी सोमय्या महापालिकेत आले होते. तेंव्हा त्यांना शिवसेने कडून धक्काबुकी सहन करावी लागली होती. त्यामुळे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यातच भाजपने हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत सोमय्या यांना पालिकेत आणण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्यांच्या प्रवेशासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र या बंदोबस्ताचा फटका सामान्य पुणेकरांना बसला. सकाळपासूनच नागरिकांना महापालिकेत येण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे महत्वाची कामे असून देखील नागरिक ही कामे करू शकले नाहीत. याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
: वसंत मोरे यांना देखील उडी मारून आत यावे लागले
बंदोबस्ताचा फटका फक्त सामान्य नागरिकांनाच नाही तर नगरसेवकांना देखील बसला. मनसे शहर अध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांना देखील उडी मारुन आत यावे लागले. मोरे म्हणाले, मी १५ वर्ष झाले पुणे महानगरपालिकेत नगरसेवक आहे,
पण आज पहिल्यांदाच इतकी अघोषित संचारबंदी पाहिली सर्व दरवाजे बंद केलेत…
नागरिक महानगरपालिकेच्या दरवाज्यात आक्रोश करत होते आणि भाजपा चे सर्व नगरसेवक नेते सत्काराच्या कार्यक्रमात अडकले होते.
माझी पार्टी मीटिंग होती बाहेर जायचे तर खूप गरजेचे होते,
मग काय भिंतीवरून उडी मारून बाहेर आलोय आणि चौकशी केली तर समजले काय तर म्हणे
माजी खासदार किरीट सोमय्या यांचा भाजपा ने ते पडलेल्या पायरीवर सत्कार ठेवलाय…
पण सत्ताधारी लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी ते महापालिकेच्या दारात पडले होते बरं का बाकी समजून जा…
—
COMMENTS