Fire system | फायर सिस्टम सुस्थितीत व कार्यान्वित ठेवण्याचे आदेश   | दुर्घटना घडल्यास मालक किंवा भोगवटाधार जबाबदार

HomeपुणेBreaking News

Fire system | फायर सिस्टम सुस्थितीत व कार्यान्वित ठेवण्याचे आदेश | दुर्घटना घडल्यास मालक किंवा भोगवटाधार जबाबदार

Ganesh Kumar Mule Apr 22, 2023 2:39 AM

Wagholirescueupdate | वाघोलीत एसपी टॅंक मध्ये पडून 3 कामगारांचा मृत्यू
Pune Mahanagarpalika Bharti 2023 | पुणे महापालिकेत आणखी 110 पदांसाठी भरती | कनिष्ठ अभियंता, उपकामगार अधिकारी यांचा समावेश
Fire brigade | recruitment and promotion | महापालिकेच्या अग्निशमन दलात भरती, पदोन्नतीचा मार्ग मोकळा…!

फायर सिस्टम सुस्थितीत व कार्यान्वित ठेवण्याचे आदेश

| दुर्घटना घडल्यास मालक किंवा भोगवटाधार जबाबदार

वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्‍वभुमीवर आगीच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी शहरातील इमारतींसह विविध प्रकारच्या आस्थापना, व्यापारी संकुले यांनी त्यांच्याकडील अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित व सुस्थितीत ठेवावी. संबंधित यंत्रणा सुस्थितीत व कार्यान्वित असल्याचे प्रमाणपत्र महापालिकेच्या अग्निशामक दलाकडे जमा करण्याचे आवाहन महापालिकेच्या अग्निशामक दलाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच कुठली दुर्घटना झाली तर त्यास इमारतीचा मालक किंवा भोगवटाधारक जबाबदार असेल, असे ही महापालिकेने म्हटले आहे.
शहरामध्ये उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. मे महिन्यामध्ये उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात जाणवतो. वाढत्या उन्हामुळे शहरामध्ये आगीच्या घटना दरवर्षी घडतात. या आगीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी, जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी अग्निशामक दलाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. त्यादृष्टीने अग्निशामक दलाकडून विविध आस्थापनांना आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील उंच इमारती, चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांच्यासह विविध प्रकारच्या आस्थापना, मोठी व्यापारी संकुले, तारांकीत हॉटेल्स, कार्यालये यांना त्यांच्या आस्थापनांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करणे बंधनकारक आहे. संबंधित ठिकाणी असलेली अग्निशामक यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याची तसेच ती कार्यान्वित ठेवण्याचे काम संबंधित आस्थापनांनी करायचे असते.यंत्रणा कार्यान्वित व सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र (फॉर्म बी) अधिकृत एजन्सीकडून घ्यायचे आहे. संबंधित प्रमाणपत्र जानेवारी व जुलै या कालावधीमध्ये अग्निशामक दलाकडे जमा करायचे आहे.दरम्यान, असे प्रमाणपत्र न दिल्यास भविष्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास त्यास इमारतीचे मालक व वापर करणारे भोगवटादार यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यामुळे अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित असल्याबाबतचे प्रमाणपत्रही जमा करण्याचे आवाहन अग्निशामक दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी केले आहे.