Online NOC for PMC Election 2025-26 | NOC साठी एकूण ४०५७ अर्ज | २४७ अर्ज बाद | ३७८३ अर्जदारांना ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र!
PMC NOC – (The Karbhari News Service) – ऑनलाईन प्रणालीद्वारे पुणे महानगरपालिकेच्या एकूण ४१ खात्यांना जोडून, उमेदवाराचा अर्ज एकावेळी सर्व खात्यांना ना हरकत प्रमाणपत्रासाठी लिंक करण्यात आले होते. ना हरकत प्रमाणपत्र मिळणेकरिता आज दुपारी १२ वाजेपर्यंत ऑनलाईन प्रणालीद्वारे एकूण ४०५७ अर्ज प्राप्त झाले. एकूण प्राप्त अर्जापैकी २७४ अर्ज खात्याच्या शिफारशीनुसार बाद करण्यात येऊन ३७८३ अर्जदारांना ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या ना हरकत प्रमाणपत्राच्या संकेतस्थळाला ६,९८,४८५ नागरिकांनी संपर्क साधला. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Corporation Election 2025-26)
पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसागठी प्रत्यक्ष मतदान दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत प्रथमच ऑनलाईन यंत्रणा अंमलात आणण्यात आली आहे. मागील निवडणूकी मध्ये भरपूर मनुष्यबळ लागत होते आणि ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी विलंब होत होता यामुळे विहित कालमर्यादेत ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे या करिता महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ साठी थकबाकी ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांसाठी खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती.
विशेष म्हणजे या कक्षाद्वारे सरासरी २४ तासाच्या आत नाहरकत वितरित करण्यात आल्या. विशेष म्हणजे शेवटच्या २ दिवसात सरासरी ४ तासात या संगणक प्रणालीमध्ये ना हरकत देण्यात आल्या. इच्छुक उमेदवारांची दमछाक कमी करण्यासाठी या संगणक प्रणालीचा चांगला उपयोग झाला असल्याच्या प्रतिक्रिया बहुतांश अर्जदारांनी दिल्या आहेत. आयुक्त नवल किशोर राम यांच्या कल्पकतेमुळे या प्रणाली चा वापर करणे शक्य झाले. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

COMMENTS