शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीच महाआरतीचे आयोजन
शिवसेनेचा महावृक्ष आणखी विशाल होण्याची प्रार्थना; श्री चरणी केला ६२ किलोंचा मोदक अर्पण
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे केवळ पुणेकरांचे नव्हे तर देशभरातल्या असंख्य गणेश भक्तांचे आराध्य दैवत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या २७ जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त आज येथे पुणे शहर शिवसेनेच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मा. श्री उद्धवजी ठाकरे यांचे सर्व संकल्प पूर्ण होवोत आणि राज्यातील जनतेच्या मनातील सर्व संभ्रम दूर होण्यासाठी आशीर्वाद मिळावेत. शिवसेनेचा वटवृक्ष विशाल महावृक्षात रुपांतरीत होवो, अशी प्रार्थना केल्याचे शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे सांगितले.
त्या म्हणाल्या, ” शिवसेना हा पक्ष शिवसैनिकांच्या भावनांवर आणि विचारांवर चालत असलेल्या पक्ष आहे. अनेक वेळा लोकांनी पक्षातून बाहेर जाण्याचा प्रसंग येऊन गेला. मात्र भगवद्गीतेच्या शिकवणीप्रमाणे जे गेले त्यांचा शोक करायचा नाही आणि आपले काम सातत्याने पुढे चालू ठेवायचे या तत्त्वानुसार मा. उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्ष आपले काम आणि कार्य जोरदारपणे सुरू ठेवत आहे.”
आज पुण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी यांच्यासह दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी श्री गणेशांना उद्धवजीच्या वाढदिवसानिमित्त ६२ किलोंचा मोदक डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.
शिवसहकार सेनेचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब भांडे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे यांनी श्रींना अभिषेक केला आणि श्री उद्धवजी ठाकरे यांना दीर्घायुष्य आरोग्य लाभावे अशी प्रार्थना केली.
या कार्यक्रमाला पुणे शहरातील सामान्य नागरिक मोठ्या संख्येने हजर होते त्याचप्रमाणे शिवसेनेचे पदाधिकारी पुणे जिल्हा संघटक
राम गायकवाड, नितिन चांदेरे बाजार समिती सदस्य, उप शहर प्रमुख आनंद गोयल, प्रशांत राणे, संतोष गोपाळ, म्हाळुंगे गावचे युवा सरपंच मयुर भांडे, संजय गवळी, अविनाश मरळ, शादाब मुलाणी, स्वप्नील कुंजीर, धनंजय चौधरी, युवराज शिंगाडे, राजू विटकर, महिला आघाडीच्या संगीता ठोसर, पल्लवी जावळे, कल्पना थोरवे, श्रुती नाझीरकर, स्वाती कथलकर, कविता आंब्रे, ज्योती चांदेरे, विद्या होडे, शर्मिला येवले, अनिता परदेशी, निकीता मारटकर, गायत्री गरुड आदी उपस्थित होते.