Omprakash Divate PMC | राजकीय पक्षांचे प्रतिनिधींकडून प्रभाग रचनेसंबंधी दिशाभूल | अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन  

Homeadministrative

Omprakash Divate PMC | राजकीय पक्षांचे प्रतिनिधींकडून प्रभाग रचनेसंबंधी दिशाभूल | अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन  

Ganesh Kumar Mule Jun 27, 2025 8:09 PM

Shivsena | पुणे शहर शिवसेना सदैव नागरिकांच्या सेवेत |शहर संपर्क प्रमुख अजय बापू भोसले आणि शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिला विश्वास
Dr Rajendra Bhosale IAS | पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कामाची चौकशी करा | राज्य सरकारकडे मागणी
Ring Road Pune | रिंगरोड साठी 47 हेक्टर वनजमीनीची आवश्यकता | ऑनलाईन प्रस्ताव वन विभागाकडे सादर

Omprakash Divate PMC | राजकीय पक्षांचे प्रतिनिधींकडून प्रभाग रचनेसंबंधी दिशाभूल | अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

 

PMC Ward Structure – (The Karbhari News Service) – प्रभाग रचनेसंदर्भातील कामकाज हे गोपनीय स्वरूपाचे असून ते प्राथमिक स्तरावर सुरु असून अद्याप प्रभाग रचनेचे EB Maping चे काम प्रत्यक्षात सुरु झालेले नसताना काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधींकडून प्रभाग रचनेसंबंधी दिशाभूल करणा-या व अफवा पसरवणा-या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. बातम्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. नागरिकांनी प्रभाग रचनेबाबतच्या दिशाभूल करणा-या व अफवा पसरवणा-या कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation Election 2025)

राज्य सरकार कडून राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद / नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांबाबत प्रभाग रचनेसंदर्भात आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. सदर आदेशात नमूद असलेल्या वेळापत्रकानुसार सद्यस्थितीत शहर जनगणना कार्यालयाकडून प्राप्त झालेली लोकसंख्या, प्रगणक गट, इ. जनगणनेची माहिती तपासणे, स्थळ पाहणी करणे इ. कामकाज प्राथमिक स्तरावर सुरु करण्यात आलेले आहे. या वेळापत्रकानुसार प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द करणे व त्यावर हरकती सूचना मागविणे व आलेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यात येणार असून त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती महानगरपालिका संकेतस्थळावर (WEBSITE) व विविध प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. (Pune PMC Election 2025)

तरी प्रभाग रचनेसंदर्भातील कामकाज हे गोपनीय स्वरूपाचे असून ते प्राथमिक स्तरावर सुरु असून अद्याप प्रभाग रचनेचे EB Maping चे काम प्रत्यक्षात सुरु झालेले नसताना काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधींकडून प्रभाग रचनेसंबंधी दिशाभूल करणा-या व अफवा पसरवणा-या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. सदर बातम्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. सबब नागरिकांनी प्रभाग रचनेबाबतच्या दिशाभूल करणा-या व अफवा पसरवणा-या कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नये. महानगरपालिका निवडणूक विषयक अद्ययावत माहितीसाठी पुणे महानगरपालिकेच्या www.pmc.gov.in या संकेतस्थळावर संपर्क केल्यास अधिकृत माहिती उपलब्ध होईल. असे अतिरिक्त आयुक्त यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.