Old Wada In Pune | पुणे शहरातील सी 1 प्रवर्गात मोडणारे वाडे लवकरच उतरवले जाणार!

HomeBreaking Newsपुणे

Old Wada In Pune | पुणे शहरातील सी 1 प्रवर्गात मोडणारे वाडे लवकरच उतरवले जाणार!

Ganesh Kumar Mule May 20, 2023 8:36 AM

PMC Chief Auditor | पुणे महापालिकेच्या नवनियुक्त मुख्य लेखापरीक्षक यांच्यापुढे कार्यालयीन शिस्तीची आणि कामकाजाची ढीगभर आव्हाने!
Water supply department of the PMC will discipline the Pune residents for Water Consumption
PMC Medical College Dean | मेडिकल कॉलेजचे डीनना सेवेतून कमी करण्याचा निर्णय! | महापालिका आयुक्तांचा निर्णय

Old Wada In Pune | पुणे शहरातील सी 1 प्रवर्गात मोडणारे वाडे लवकरच उतरवले जाणार!

 | पुणे महापालिका प्रशासनाची (Pune civic body) तयारी सुरु

Old Wada In Pune | (Author: Ganesh Mule) | पुणे शहरातील (Pune city) सी 1 प्रवर्गात (C 1 Category) मोडणारे म्हणजेच अति धोकादायक वाडे (Dangerous Old Wada) लवकरच उतरवले जाणार आहेत. महापालिका प्रशासनाने (Pune Municipal Corporation) त्याची तयारी सुरु केली आहे. संबंधित वाडा मालकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. टेंडर प्रक्रिया राबवून पावसाळा सुरु होण्याअगोदर वाडे उतरवण्यात येतील. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून (PMC Pune) देण्यात आली. (Old Wada in Pune)

पुणे शहरातील धोकादायक वाडे/इमारती यांचे सर्वेक्षण करणेचे काम  (Pune city old wada survey) टेक ब्युरो इंजि. प्रा.लि. (Tech beuro engineer private limited) यांचेकडून बांधकाम विभागाकडून चालू आहे. पुणे शहरात अंदाजे अडीच ते तीन हजार वाडे (old Wada) असून या सर्वेक्षणा अंतर्गत आज अखेर सुमारे १२०० वाडे / इमारतींचे सर्वेक्षण (Old wada survey) करण्यात आले आहे. त्यापैकी ३० वाडे अतिधोकादायक (सी१) या प्रवर्गात असल्याचा अहवाल टेकब्युरो इंजि.प्रा.लि. यांचेकडून प्राप्त झाला आहे. धोकादायक वाड्यांना नोटीसा (notices) बजावण्यात आल्या आहे. तसेच उर्वरीत सर्वेक्षण ३० मे २०२३ पर्यत पूर्ण करण्यात येणार असून सुमारे ३० ते ४० वाडे अतिधोकादायक (सी१) या प्रवर्गात येण्याची शक्यता आहे. (Pune old Wada news)

 पुणे शहरातील जुने वाडे हे बहुतांशी लाकडी बांधकामातील वैशिष्ट्यपूर्ण संरचनेमध्ये असून पावसाळ्यामध्ये अतिधोकादायक वाडे / इमारती पडण्याची शक्यता जास्त असते.  शासन परिपत्रकाचे अनुषंगाने तसेच दुर्घटना होऊ नये. याकरिता हे धोकादायक वाडे /इमारती पावसाळ्यापुर्वी निष्कासित करणे आवश्यक आहे.  त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यांनतर यावर कार्यवाही केली जाणार आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pune Municipal Corporation News)

चार टप्यात वर्गीकरण कसे ?

 सी-१ म्हणजे राहण्यास योग्य नाही, तात्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत. सी-२ ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे. सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे. आणि सी-३ म्हणजे इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणे असे चार टप्यात वर्गीकरण केले जात आहे. तशी सूचना पालिका प्रशासनाकडून इमारतींना देण्यात येते. (PMC Pune Marathi News)
—–
News Title | Old Wada In Pune | old Wada falling under C1 category in Pune city will be demolished soon   |  Preparation of Pune Municipal Administration started