Old Pune New DP | पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या नवीन विकास आराखड्यात केला जाणार फेरबफल!

HomeBreaking Newsपुणे

Old Pune New DP | पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या नवीन विकास आराखड्यात केला जाणार फेरबफल!

कारभारी वृत्तसेवा Dec 18, 2023 4:51 AM

PMC Sanas Ground | सणस मैदान ‘चालवण्याचा’ भार महापालिकेला पेलवेना | पहिल्यांदाच मैदान भाडेतत्वावर देण्याचा निर्णय
Navale Bridge Service Road | ब्ल्यूम फिल्ड ते भूमकर चौक दरम्यान 6 मी रुंदीचा सर्व्हिस रस्ता विकसित होणार!
Bhakti Shakti Statue | PMC | लोहगांव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचा पूर्णाकृती भक्ती शक्ती पुतळा बसवला जाणार!

Old Pune New DP | पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या नवीन विकास आराखड्यात केला जाणार फेरबफल!

| क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके रस्ता हा २४ मी. ऐवजी 15 मी रुंदीचा केला जाणार

Old Pune New DP | मान्य विकास आराखड्यामध्ये (Pune Devlopment Plan)पुणे पेठ सदाशिव मधील खजिना विहीर चौक ते नागनाथपार चौक दरम्यानचा रस्ता (क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके रस्ता) हा २४ मी. रुंदीचा प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र यामुळे काही मिळकती बाधित होत आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांनी हा रस्ता 15 मी करण्याची मागणी केली होती. यावर राज्य सरकारने महापालिकेचा (PMC Pune) अभिप्राय मागवला होता. त्यानुसार महापालिकेने 15 मी रस्ता करण्याबाबत अहवाल तयार केला आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून शहर सुधारणा समिती (PMC City Improvement Committee) समोर ठेवण्यात आला आहे.  (Pune Municipal Corporation)

अर्जदार श्री. दिलीप जोशी व इतर यांनी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके रस्ता हा २४ मी. रुंदीचा प्रस्तावित केल्याने या रस्त्यावरील सन १७७४ साली बांधलेले वारसा यादीमध्ये असलेले पुण्यातील पुरातन लक्ष्मी नृसिंह मंदिराचा मोठा भाग रस्ता रुंदीकरणात जात आहे. सि.स.नं. १४२०, सदाशिव पेठ व त्यामुळे पुरातन ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तू नष्ट होणार आहे. त्यामुळे सदरचा फडके रस्ता मान्य सुधारित विकास आराखडा (२००७-२७, सेक्टर-१, शीट क्र. ६ व ९) मध्ये प्रस्तावित करण्यात आलेला २४ मी. रस्ता रुंदी डीपी रद्द करून तो सन १९८७ च्या मंजूर आराखड्याप्रमाणे १५ मी. ठेवावा अशी मागणी संबंधितांनी केली आहे. त्यास अनुसरून अवर सचिव यांनी पुणे महानगरपालिकेचा अहवाल सादर करणेबाबत कळविले होते. (PMC Pune News)

पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा सुधारित विकास आराखडा (२००७-२७) शासनाने सन २०१७ मध्ये मंजूर केला आहे. सदर मान्य विकास आराखड्यामध्ये पुणे पेठ सदाशिव मधील खजिना विहीर चौक ते नागनाथपार चौक दरम्यानचा रस्ता (क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके रस्ता) हा २४ मी. रुंदीचा प्रस्तावित करण्यात आला आहे.  रस्ता हा दक्षिण दिशेला असून या रस्त्यावर पुरातन ऐतिहासिक लक्ष्मी नृसिंह मंदिर हे पश्चिमेकडे आहे. सन २०१७ चे मान्य विकास आराखड्यानुसार प्रस्तावित २४ मी. रस्तारुंदीमध्ये सदर मंदिराचा गाभारा आहे. तो तसाच राहणार असून सभामंडप हा दक्षिणेकडील बाजूस ८ मी. ने व उत्तरेकडील बाजूस ९०६ मी. ने बाधित होत आहे. तसेच प्रस्तुत बाबत वारसा व्यवस्थापन विभाग यांचेकडील अभिप्राय  प्राप्त झाला असून “मान्य २०१७ डी.पी. मध्ये क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हा रस्ता १५ मी. ऐवजी २४ मी. रुंदीचा केल्यास ग्रेड -१ दर्जाचे खुन्या मुरलीधर मंदिर व ग्रेड -२ दर्जाचे लक्ष्मी नृसिंह मंदिर या दोन्ही वास्तू बाधित होत असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने खुन्या मुरलीधर मंदिर चौक ते खजिना विहीर चौक या संबंध रस्त्याची रस्तारुंदी रद्द करण्याची पुणे महानगरपालिकेच्या हेरीटेज कमिटीची शिफारस आहे.” असे कळविले आहे.
जागेवरील रस्त्याचे टोटल स्टेशन मशिनद्वारे सर्वेक्षण केले असता १५ मी. रस्तारुंदीमध्ये एकुण ३२मिळकती बाधित होत आहेत. यामध्ये पुर्व बाजूकडील २१ व पश्चिम बाजूकडील ११ मिळकतींचा समावेश आहे. सन २०१७ चे मान्य विकास आराखड्यामधील २४ मी. डीपी. रस्त्याने एकुण १२७ मिळकती बाधित होत आहेत. यामध्ये रस्त्याचे पुर्व बाजूकडील ५८ व पश्चिम बाजूकडील ६९ मिळकतींचा समावेश होत आहे. त्यामुळे खुन्या मुरलीधर चौक ते खजिना विहीर चौक (श्रीधर स्वामी चौक) सदरचा रस्ता सन १९८७ चे मान्य डी.पी. नुसार १५ मी. कायम करणे असे कळविण्यात आले होते.

त्यानुसार सरकारने महापालिकेला कळवले होते कि, पुणे शहराच्या मूळ हद्दीच्या मंजूर सुधारित विकास योजनेनुसारच्या खजिना विहीर चौक तेनागनाथपार चौक दरम्यानच्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके रस्त्याची रुंदी २४मी. ऐवजी १५ मी. पर्यंत कमी करण्यापेक्षा १८ मी. पर्यंत करणे शक्य आहे किंवा कसे? हे तपासावे व त्यानुसार, सदर रस्त्याची रुंदी १९८७ च्या मंजूर विकास योजनेनुसार १५ मी. अथवा १८ मी. करणेबाबत प्रस्ताव शासनास सादर केल्यास शासन त्यावर गुणवत्तेवर निर्णय घेईल. त्यानुसार महापालिकेने रस्ता 15 मी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव आता शहर सुधारणा समिती समिती समोर ठेवण्यात आला आहे.