जुनी पेन्शन योजना | 14 मार्च च्या संपाला महापालिका कामगार युनियनचा पाठिंबा | मनपा कर्मचारी संपात सहभागी नसतील
14 मार्च 2023 पासून महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या मागण्यांकरिता बेमुदत संपावर जाणार आहेत. ‘नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी ही या संपाची प्रमुख मागणी आहे. पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चा या संपाला व मागण्यांना पूर्ण पाठिंबा आहे. मात्र यात महापालिका कर्मचारी सहभागी होणार नाहीत. असे संघटनेने म्हटले आहे. (Old pension scheme strike)
संघटनेच्या निवेदनानुसार महाराष्ट्र सरकारने कुठलीही दडपशाही न करता चर्चा करून या प्रश्नांची सोडवणूक करावी व मागण्या मान्य कराव्यात व संविधानिक अधिकाराचे रक्षण करावे अशी आम्ही मागणी करीत आहोत. महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील सर्व कामगार कर्मचाऱ्यांच्या या संपाला व त्यांच्या मागणीला पाठिंबा आहे. परंतु आताच्या घडीला महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील कामगार कर्मचारी या बेमूदत संपात सहभागी नाहीत. अशा स्थितीत पुढील काळात सर्वांचा एकत्रित निर्णय होईल त्याप्रमाणे पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) आपली भूमिका जाहीर करेल. (PMC kamgar Union)