IT nodal officers : आता महापालिकेच्या प्रत्येक विभागात दोन आयटी नोडल ऑफिसर! 

HomeBreaking Newsपुणे

IT nodal officers : आता महापालिकेच्या प्रत्येक विभागात दोन आयटी नोडल ऑफिसर! 

Ganesh Kumar Mule May 13, 2022 11:18 AM

PMC IT Department | पुणे महापालिकेच्या प्रत्येक विभागात आयटी विषयक कामासाठी आता दोन नोडल ऑफिसर!
Nodal Officer | सचिवालय कक्षात महापालिकेचा समन्वय अधिकारी | नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष
Biometric Attendance | बायोमेट्रिक हजेरीसाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती बंधनकारक | नोडल ऑफिसरसाठी मंगळवारी कार्यशाळा | उपस्थित राहणे अनिवार्य

आता महापालिकेच्या प्रत्येक विभागात दोन आयटी नोडल ऑफिसर!

: माहिती व तंत्रज्ञान विषयक कामकाजाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यावर भर

पुणे . महापालिका माहिती व तंत्रज्ञान विषयक कामकाजाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यावर भर देत आहे. त्यासाठी आता महापालिकेच्या प्रत्येक विभागात दोन आयटी नोडल ऑफिसर ची नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश उपायुक्त सचिन इथापे यांनी नुकतेच जारी केले आहेत.

उपायुक्त सचिन इथापे यांच्या आदेशानुसार सर्वच क्षेत्रामध्ये सध्या संगणक तंत्रज्ञानाचा प्रचंड वापर वाढत असून पुणे महानगरपालिका देखील
माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रभावीपणे कामकाज करत आहे. पुणे महानगरपालिकेतील सर्व विभागांमार्फत माहिती व तंत्रज्ञान संबंधित कामकाज करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेकडील संगणक प्रणाली विषयक कामकाजाकरिता समन्वय साधण्यासाठी सर्व विभागांमार्फत समन्वय अधिकारी (आय टी नोडल ऑफिसर ) यांची नेमणूक करण्यात यावी.

पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर आपल्या विभागाची माहिती अद्यावत करणे.(उदा. माहिती अधिकार कलम ४, कलम ६०अ, नागरीकांची सनद, विभाग संपर्क माहिती इ.), तक्रार निवारण प्रणालीवरील (आपले सरकार ,पी.जी पोर्टल , PMC Care) तक्रारीचे समन्वय साधणे व निरस्त करणे व प्रणालीविषयी तांत्रिक अडचणी आल्यास माहिती व तंत्रज्ञान विभागाशी समन्वय साधणे , दरमहा सर्व मासिक अबहाल Spreadsheet मध्ये व Periodical reports प्रणाली मध्ये भरणे व इतर सर्व संगणक विषयक कामांसाठी समन्वयक साधण्याची जबाबदारी आपल्या विभागातील आय टी नोडल ऑफिसर यांच्या वर निश्चित करण्यात यावी.

य सर्व खातेप्रमुख/विभाग प्रमुख यांनी माहिती व तंत्रज्ञान विषयक
कामकाजाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे करिता आपल्या विभागाची संपूर्ण माहिती असलेल्या व संगणकाचे ज्ञान असलेल्या दोन सेवकांची आयटी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करुन सदर माहिती आपल्या ईमेलवर पाठविलेल्या Spreadsheet मध्ये विहित नमुन्यात दि.१८/०५/२०२२ सं ०५:०० वाजेपर्यंत सादर करावी. तसेच खात्याकडील आयटी नोडल ऑफिसर यांची बदली /बढती झाल्यास त्याजागी नवीन आयटी नोडल ऑफिसर यांची नियुक्ती करून त्याची माहिती सामान्य प्रशासन विभागास व माहिती व तंत्रज्ञान विभागास अवगत करावे. असे आदेश उपायुक्तांनी दिले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0