वैकुंठ स्मशानभूमीसाठी आता टेक्निकल कन्सल्टन्ट!
: 15 लाखांचा येणार खर्च
पुणे : वैकुंठ स्मशानभूमीचे परिसरातील नागरिकांकडून स्मशानभूमीमधून बाहेर पडणाऱ्या धुराबाबत व तेथील प्रदूषणाबाबत वारंवार पुणे मनपाकडे लेखी व ऑनलाईन स्वरुपात तक्रारी येत असून याबाबत स्थानिक नागरिकांनी मएन. जी. टी मध्ये तसेच उच्च न्यायालय, मुंबई येथे दावा दाखल केलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करून वैकुंठ स्मशानभूमी येथील प्रदूषण कमी करण्यासाठी तेथे अस्तित्वात असलेल्या सर्व यंत्रणेची तपासणी नीरी या केंद्रशासनाचे संस्थेमार्फत त्रयस्त पद्धतीने करून घेण्यासाठी नीरी नागपुर यांना कार्यादेश देण्यात आलेला आहे. यासाठी महापालिकेला वर्षभरासाठी 15 लाखांचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेचे अंतर्गत वैकुंठ स्मशानभूमी येथे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील शवदहन करण्यासाठी एकुण सहा वुड पायर सिस्टिम असलेले चार ए. पी. सी शेड, एक गॅस दाहिनी व तीन विदुयत दाहिनी कार्यान्वित आहेत. सदर दाहीन्यांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी तीन विदुयत दाहीन्यांसाठी तीन स्वतंत्र स्क्रबर व ब्लोअर युनिट बसविण्यात आले आहे, एक गॅस दाहिनीसाठी
स्वतंत्र स्क्रबर व ब्लोअर युनिट बसविण्यात आले आहे. शवदहनानंतर दाहीनिमधून बाहेर पडणाऱ्या धुरावर प्रक्रिया करून ३०.५ मी. उंचीच्या चिमणी मधून हवेमध्ये धूर सोडण्यात येत आहे. तसेच वूड पायर सिस्टिमचे
चार शेडमधील शवदहनानंतर होणारा धूर प्रक्रिया करून चार स्वतंत्र स्क्रबर ब्लोअर व चिमणीद्वारे हवेमध्ये सोडण्यात येतो.
परंतु बैकुंठ स्मशानभूमीचे परिसरातील नागरिकांकडून स्मशानभूमीमधून बाहेर पडणाऱ्या धुराबाबत व तेथील प्रदूषणाबाबत वारंवार पुणे मनपाकडे लेखी व ऑनलाईन स्वरुपात तक्रारी येत असून याबाबत स्थानिक नागरिकांनी मे.एन. जी. टी मध्ये तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दावा दाखल केलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करून वैकुंठ स्मशानभूमी येथील प्रदूषण कमी करण्यासाठी तेथे अस्तित्वात असलेल्या सर्व यंत्रणेची तपासणी मे नीरी या केंद्रशासनाचे संस्थेमार्फत त्रयस्त पद्धतीने करून घेण्यासाठी नीरी नागपुर यांना कार्यादेश देण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने मे. नीरी, नागपुर यांनी वैकुंठ स्मशानभूमी येथील ए.पी.सी. सिस्टीम बदलण्यासाठीचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे.
वैकुंठ स्मशानभूमी येथील ए.पी.सी. सिस्टीम बदलण्यासाठी
नीरी नागपुर टेक्निकल कन्सल्टंट, कॉमन व सेप्रेट ए.पी.सी. युनिटचे डिजाइन करणे, निविदा प्रक्रिया राबविणेसाठी टेक्निकल स्पेसिफिकेशन पुरविणे, ए.पी.सी. सिस्टीम बसविणे व ऑपरेशन करणे या कामी टेक्निकल सपोर्ट देणे, ए.पी.सी. सिस्टीम चे एक वर्षे कालावधीसाठी परफॉर्मन्स टेस्टिंग करणे, आवश्यकता भासल्यास ए.पी.सी. सिस्टीम मध्ये सुधारणा करणे व वैकुंठ स्मशानभूमीमधील इतर प्रदूषण विषयक समस्यांना कन्सल्टंट म्हणून एक वर्षासाठी काम करणे इ. कामे करून घेण्यात येणार आहेत.

COMMENTS