आता 8 मार्च ला दरवर्षी महिलांसाठी महापालिकेकडून आरोग्य तपासणी शिबीर
: महिला बाल कल्याण समितीने मान्य केला प्रस्ताव
: असा आहे प्रस्ताव
पुणे शहर मध्ये आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणात जलद गतीने पुणे शहरामध्ये उपलब्ध असतात. सध्याच्या २१ व्या शतकात व्यवसाय, नोकरी इ. ठिकाणी पुरूषांच्या बरोबरीने महिलाही काम करतात. सध्याच्या धकाधकीच्या काळात महिलांना कौटुंबिक जवाबदारी बरोबरच त्यांना कार्यालयीन अथवा व्यावसायिक जवाबदारीही पार पाडावी लागते. सहाजिकच या धावपळीचा महिलांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. परंतु, महिलांमध्ये पूर्वप्राथमिक तपासण्या करून घेवून आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकडे कमी कल दिसून येतो. यातूनच असाध्य रोगाचे निदान महिलांमध्ये जास्त प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. महिला, किशोरवयीन मुलींना रोगपूर्व निदान तपासणी व कौन्सलिंग करून महिला व किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्याचे महत्व अधोरेखित केले पाहिजे. त्या योगे पुणे शहरातील झोपडपट्टी भाग व पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करणे अधिक आवश्यक असल्याचे दिसून येते. ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता ७ वी ते इयत्ता १० वी पर्यंतच्या किशोरवयीन मुलींसाठी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करावे. तसेच पुणे शहरातील सर्व महिलांसाठी पुणे महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यात व रूग्णालयांमध्ये महिलांसाठी आरोग्य विभागामार्फत मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात यावे. त्यातूनच त्यांना अॅनिमिया, ब्रेस्ट कॅन्सर इ. प्रकारच्या आजारांबद्दलची जनजागृती करून द्यावी, जेणेकरून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. जागतिक महिलादिनानिमित्त सदरचे आरोग्य शिबीर यावर्षी प्रमाणे दरवर्षी ८ मार्च रोजी राबविण्यात यावे. या प्रस्तावाला महिला बाल कल्याण समितीने मान्यता दिली आहे.
COMMENTS