Nitin Gadkari: दादा आणि ताईंनी गडकरी साहेबांचं केलं भरभरून कौतुक!

HomeपुणेPolitical

Nitin Gadkari: दादा आणि ताईंनी गडकरी साहेबांचं केलं भरभरून कौतुक!

Ganesh Kumar Mule Sep 24, 2021 3:11 PM

NCP Youth Pune | पुणे शहर युवक अध्यक्षपदी समीर चांदेरे यांची चर्चा
Chhatrapati Shivaji Maharaj | लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येणार
PMC Pune Scholarship | १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय मार्गी लावण्याची मागणी 

दादा आणि ताईंनी गडकरी साहेबांचं केलं भरभरून कौतुक!

: राजकारणातील सुसंकृत चेहरा

पुणे: कुठल्याही राजकारणाचे व्यासपीठ आणि तिथे जर वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी असले तर एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढल्या जातात. मात्र अशा व्यासपीठावर जेंव्हा नितीन गडकरी असतात, तेव्हा मात्र राजकारणापेक्षा विकासावर जास्त चर्चा असते. त्या ठिकाणी व्यासपीठावर राजकीय चिखलफेकी पेक्षा चैतन्यमय वातावरण असते. याचीच प्रचिती पुण्यातल्या एका कार्यक्रमात आली. आणि त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भरभरून कौतुक केले. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या जाणे साहजिक होते.

: सर्वात पॉप्युलर मंत्री

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात 221 किलोमीटर लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा नारळ गडकरींच्या हस्ते आज शुक्रवारी (दि. 24) फोडला. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल 134 कोटीं रुपयांची रस्ते, पुलांची कामे करण्यात येणार आहेत. त्यात कात्रज कोंढवा सहा पदरी उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा देखील समावेश होता. या भूमिपूजनाच्या वेळी मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले कि, हा पूल आम्ही डबल डेकर कसा करता येईल याबाबत प्रयत्न करू. जेणेकरून बरीच समस्या सुटेल. शिवाय त्यांनी ग्वाही दिली की, अशा सर्व प्रकल्पासाठी भारत सरकार नेहमी सहकार्य करेल. यावेळी मंत्री गडकरी यांच्या अगोदर खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषणे झाली. खासदार सुप्रिया सुळे आपल्या भाषणात म्हणाल्या, केंद्रातील सर्वात पॉप्युलर मंत्री म्हणजे गडकरी. ते कधीही पक्ष, मतदार संघ यात अडकत नाहीत. कोणत्याही पक्षाचा खासदार किंवा लोकप्रतिनिधी आला तरी ते मदत करण्यासाठी हाथ पुढे करतात. आमच्या मनातील चांगले मंत्री गडकरी. राजकारणातील सुसंस्कृत चेहरा म्हणजे गडकरी. त्यांच्याकडून सर्वानांच खूप शिकायला मिळते.

:आपुलकीच्या नात्याने कामे करतात – पवार

सुप्रिया ताईंचे भाषण झाल्यांनतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील गडकरींचे कौतुक केले.  पवार  म्हणाले गडकरी साहेब आज आल्याने खूप प्रकल्प मार्गी लागले आहेत. गडकरी साहेब आपुलकीच्या नात्याने सर्व कामे करतात. गडकरी साहेब जसे सुचवतील तसे आम्ही राज्यात विकास करण्यात सहकार्य करू. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे म्हणाल्या की, गडकरी आहेत म्हणून व्यासपीठावर चैतन्य आहे.
 
एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांकडून गडकरी साहेबांचे कौतुक होत असताना दुसरीकडे व्यासपीठावर जास्त संख्येने बसलेल्या भाजप नेत्यांच्या मनात काय भावना उचंबळून आल्या असतील, हे तेच जाणो. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0