NCP Agitaiton : पुण्यात राष्ट्रवादीचे भोंगा आंदोलन 

HomeपुणेBreaking News

NCP Agitaiton : पुण्यात राष्ट्रवादीचे भोंगा आंदोलन 

Ganesh Kumar Mule Apr 29, 2022 2:33 PM

Road Digging | NCP | रस्ते खोदाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन
Dr. Pradeep Kurulkar Latest News | NCP Agitation | डॉं. कुरूलकरच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची तिव्र निदर्शनें
NCP | Agitation | झाडे वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे झाडावर चढून आंदोलन!

पुण्यात राष्ट्रवादीचे भोंगा आंदोलन

राज्यासह देशात सुरू असणाऱ्या भोंगे व इतर धार्मिक राजकारणाच्या विरोधात नागरिकांच्या ज्वलंत प्रश्न असणाऱ्या महागाईच्या विरोधात आज पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने गुडलक चौकात अभिनव “भोंगे आंदोलन” करण्यात आले. या आंदोलनात नरेंद्र मोदींच्या जुन्या भाषणांच्या क्लिप्स भोंग्यांवर लावण्यात आल्या ज्याला या चौकातून जाणाऱ्या नागरिकांनी दाद दिली.

देशात महागाईने स्वातंत्र्यानंतरचे सर्व रेकॉर्ड मोडले असून, भविष्यात दुसरे कोणतेही सरकार आल्यानंतर देखील मोदी सरकारचा महागाईचा रेकॉर्ड तोडू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या गोष्टींमध्ये गेल्या ४८ वर्षात जी भाव वाढ झाली नाही, ती फक्त आठ वर्षात मोदीजींनी करून दाखवली आहे. विशेष म्हणजे 2014 पूर्वी निव्वळ सत्ता हस्तगत करण्यासाठी आपल्या अनेक भाषांमध्ये नरेंद्र मोदींनी महागाईबद्दल विविध गोष्टी बोलले असून आज त्याच गोष्टी त्यांना पुन्हा एकदा ऐकवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केंद्र सरकारला आरसा दाखवण्याचे काम केले आहे.

जर येत्या काळात केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारने या जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करत नागरिकांना दिलासा दिला नाही तर राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहरातील प्रत्येक चौकात प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर अशा प्रकारचे भोंगे लावून नरेंद्र मोदीं च्या तत्कालीन भाषणाची आठवण वेळोवेळी नागरिकांना करून देईल असा इशारा शहराध्यक्ष  प्रशांत जगताप यांनी दिला.

या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुषमा सातपुते, शहर उपाध्यक्षा श्वेता मिस्त्री ,प्रीती धोत्रे ,अपर्णा पाटसकर ,पूनम धोत्रे ,हार्डीका ओव्हाळ ,मृणाल ओव्हाळ ,प्रियांका सोनवणे,राखी श्रीराव यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.