NCP – SCP on PMC Election | महाविकास आघाडी म्हणूनच लढणार | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची ठाम भूमिका

HomeBreaking News

NCP – SCP on PMC Election | महाविकास आघाडी म्हणूनच लढणार | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची ठाम भूमिका

Ganesh Kumar Mule Dec 06, 2025 9:16 PM

Mahavikas Aghadi on EVM | महाविकास आघाडीचा आक्रमक | पवित्रा लोकशाहीच्या हत्येचा तीव्र निषेध
Mahavikas Aghadi Pune Vs Modi Gov : मोदी सरकारच्या दडपशाहीला पुण्यातून महाविकास आघाडीचा विरोध
Pune Zilha Sahkari Dudh Utpadak Sangh | Mahavikas Aghadi Pune | क्रीडांगण आरक्षणा वरून महाविकास आघाडी उद्या करणार आंदोलन 

NCP – SCP on PMC Election | महाविकास आघाडी म्हणूनच लढणार | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची ठाम भूमिका

 

Mahavikas Aghadi Pune – (The Karbhari News Service) – गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष महायुतीतील एखाद्या पक्षासोबत आघाडी करणार अशी चर्चा माध्यमांमध्ये पेरण्यात आली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मोदी बागेत भेट घेतली. या भेटीत प्रशांत जगताप यांनी शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे नेतृत्वासमोर मांडले. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर पुणे शहरात आपण महाविकास आघाडी सोबत लढणार असे निर्देश शरद पवार  यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना दिले आहेत. याबाबत प्रशांत जगताप यांनी  माध्यमांना सविस्तर माहिती दिली. (PMC Election 2025)

या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहरातील सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक रास्ता पेठेतील शांताई हॉटेल येथे पार पडली. या बैठकीतही बहुतांश नेत्यांनी आपण महायुतीतील कोणत्याही पक्षासोबत न जाता महाविकास आघाडी म्हणून शहरात लढावे अशी भूमिका मांडली. या बैठकीचा वृत्तांत उद्या पत्राद्वारे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार, कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांना पाठवला जाईल. पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतील तो मान्य केला जाईल हे सर्वानुमते मान्य करण्यात आले.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी खासदार वंदना चव्हाण, आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, कमलनानी ढोले पाटील, जगन्नाथबापू शेवाळे, अंकुश काकडे, प्रकाशआप्पा म्हस्के, रवींद्र माळवदकर, अश्विनी कदम, सुरेंद्र पठारे, पंडित कांबळे, डॉ. सुनील जगताप, विशाल तांबे, काकासाहेब चव्हाण, श्रीकांत पाटील, उदय महाले यांच्यासह इतरही नेते या बैठकीस उपस्थित होते.

यानंतर पुढील दोन दिवसात इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम व पक्षाच्या जाहीरनामा बाबत कार्यक्रम जाहीर केला जाईल अशी माहिती प्रशांत जगताप यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: