NCP Pune Agitation | दिल्लीत क्रिडापटुंना पोलिसांकडून केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुणे राष्ट्रवादीचे आंदोलन

HomeBreaking Newsपुणे

NCP Pune Agitation | दिल्लीत क्रिडापटुंना पोलिसांकडून केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुणे राष्ट्रवादीचे आंदोलन

Ganesh Kumar Mule May 29, 2023 2:17 PM

MLA Madhuri Misal | नालेसफाईचा महापालिका प्रशासनाचा दावा फोल | कृती आराखडा करून तातडीने अंमलबजावणी करण्याची आमदार माधुरी मिसाळ यांची मागणी
Pramod Nana Bhagire | रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करून सांस्कृतिक राजधानीवर लागलेला डाग कायमचा पुसून टाका | प्रमोद नाना भानगिरे
E-Content Development Workshop | ओतूरच्या वाघिरे महाविद्यालयात ई-कंटेंट डेव्हलपमेंट कार्यशाळा संपन्न

NCP Pune Agitation | दिल्लीत क्रिडापटुंना पोलिसांकडून केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुणे राष्ट्रवादीचे आंदोलन

NCP Pune Agitation | दिल्लीत नविन संसद भवनाचे (New parliament) उद्घाटन होत असताना केंद्र सरकारच्या पोलीसांकडून आंतरराष्ट्रीय क्रिडापटुंना (Wrestler Agitation) झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP Pune Agitation) वतीने गोपाळ कृष्ण गोखले चौक येथे आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनात “नरेंद्र मोदी राजीनामा द्या”,”अमित शहा राजीनामा द्या”,”ब्रुजभूषणसिंग यांना अटक झालीच पाहिजे ” खिलाडीयों के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान मे या घोषणांनी परिसर दनानुन सोडला. (NCP Pune Agitation)

एकीकडे संसद भवनाचे लोकार्पण होत असताना दिल्लीमध्ये लोकशाहीची हत्या चालू होती व ते काल संपूर्ण देश पाहत होता. वर्षानुवर्षे कष्ट करून स्वतःचे नव्हे तर देशाचे स्वप्न पूर्ण करण्यात आयुष्य पणाला लावून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान उंचाविणाऱ्या खेळाडूंचे आंदोलन चिरडून टाकण्यात आले.साक्षी मलिक, विनेश फोगाट यांसह अनेक क्रिडापटूंना पोलिसांकडून धक्काबुक्की व मारहाण करत त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. (Pune news)

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President prashant Jagtap) म्हणाले की, “आंदोलन करत असलेल्या महिला खेळाडू या कुठल्याही सोयीसुविधांसाठी आंदोलन करत नाहीत तर त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचार व लैंगिक शोषणासारख्या गंभीर आरोपात आरोपी असलेल्या भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांना अटक होत नाही, या कारणासाठी हे आंदोलन सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना अक्षरशः फरफटत नेऊन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे.खेळाडूंना प्रशासनाकडून अशी वागणूक भेटत असेल तर यासारखे दुर्दैव कोणतेच नाही.आज एकीकडे लोकशाहीचा जयजयकार चालू असताना दुसरीकडे त्याच लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना पायदळी तुडवत असतानाचे दृष्य या संपूर्ण देशांने पाहिले आहे.मग देशाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने चालू आहे हा यक्ष प्रश्न उभा राहत आहे. देशातील खेळाडूंचा अपमान हा देशाला लाभलेल्या जाज्वल्य क्रीडा परंपरेचा अपमान आहे. देशातील खेळाडूंना जर अशी वागणूक मिळणार असेल तर ही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापि सहन करणार नाही, या खेळाडूंना अशाप्रकारे मारहाण करणाऱ्या पोलिसांचे निलंबन करण्यात यावे”. (NCP Pune)

या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप ,प्रवक्ते प्रदीप देशमुख, ,रविंन्द्र माळवदकर , प्रमित गोरे , रूपेश संत , अंजली लोटके ,आलिम शेख रूपाली बिबवे, अजय पवार , पायल चव्हाण, भक्ती कुंभार , ऋशिकेश कडू , गजानन लोंढे यांसह अनेक कुस्तीपटु व खेळाडू देखील उपस्थित होते.


News Title | NCP Pune Agitation | Protest by Pune NCP to protest against beating of sportspersons by police in Delhi