PMC: ऐन वेळेला दाखल केलेल्या भाजपच्या प्रस्तावांना राष्ट्रवादीचा विरोध

HomeBreaking Newsपुणे

PMC: ऐन वेळेला दाखल केलेल्या भाजपच्या प्रस्तावांना राष्ट्रवादीचा विरोध

Ganesh Kumar Mule Nov 26, 2021 2:34 PM

Marathi Language Officer : मराठी भाषेबाबत महापालिकेला “उशिरा सुचलेले शहाणपण”! 
PMRDA : Pune Metro : पुणे मेट्रोला PMRDA चा इशारा! 
Mahatma Jyotiba Phule Janaarogya Yojana | महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना  | रुग्णांसाठी महापालिका दीड कोटींची साधनसामुग्री खरेदी करणार 

ऐन वेळेला दाखल केलेल्या भाजपच्या प्रस्तावांना राष्ट्रवादीचा विरोध

: शहर सुधारणा समितीत घ्यावे लागले मतदान

पुणे : शहर सुधारणा समितीच्या बैठकीत काही प्रस्ताव भाजपच्या नगरसेवकांनी ऐन वेळेला दाखल केले. मात्र या बाबत राष्ट्रवादीने चांगलाच आक्षेप घेतला. महापालिकेच्या मिळकती भाडेकराराने देताना त्यावर प्रशासनाचा अभिप्राय घेणे गरजेचे आहे, असे सांगत राष्ट्रवादीने हे प्रस्ताव मंजूर करण्यास विरोध केला. त्यावर भाजपने मतदान घेण्यास सांगितले. अपेक्षेप्रमाणे प्रस्ताव भाजपाच्या बाजूनेच मंजूर झाले. मात्र राष्ट्रवादीने आरोप केला कि आगामी काळात आपली सत्ता येणार नाही म्हणून भाजप कसलेही प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेत आहे.

: भाजपच्या नगरसेवकांचे प्रस्ताव

शहर सुधारणा समितीच्या बैठकीत भाजपच्या नगरसेवकांकडून ऐन वेळेला काही प्रस्ताव दाखल करण्यात आले. त्यामध्ये प्रभाग  क्र ४१ कोंढवा बु.सर्वे नं-५८,येथील छत्रपती संभाजी महाराज व्यायाम शाळा व योगा हॉल हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी बहुउदेशीय ग्रामीण सेवाभावी संस्था कात्रज-कोंढवा रोड या संस्थेला विविध समाज उपयोगी कामाकरता ५ वर्षा साठी नाममात्र भाडयाने देण्यास मान्यता देण्यात यावी. तसेच प्रभाग क्र ४१ कोंढवा बु.सर्वे नं-५९,येथील लोकनेते गोपीनाथराव मुडे विरंगुळा केंद्र हा भैरवनाथ ग्राम विकास मंडळ या संस्थेला विविध समाज उपयोगी कामाकरता ७ वर्षा साठी कालावधीसाठी नाममात्र भाडयाने देण्यास मान्यता देण्यात यावी. त्याच प्रमाणे प्रभाग क्र ४१ कोंढवा बु.सर्वे नं-२,येथील लोकनेते गोपीनाथराव मुडे व्यायम शाळा व पहिल्या मजल्यावरील ह.भ.प.पुंडलिक विठ्ठल टिळेकर बहुउदेशीय हॉत हा भैरवनाथ ग्राम विकास मंडळ या सस्थेला विविध समाज उपयोगी कामाकरता ५ वर्षासाठी नाममात्र भाडयाने देण्यास मान्यता देण्यात यावी. याचबरोबर प्रभाग क्र ४१ कोंढवा बु.सर्वे नं-१५,येथील शूरवीर येसाजी कामठे कुस्ती संकुल येथील हॉल हा भैरवनाथ ग्राम विकास मंडळ या सस्थेला विविध समाज उपयोगी कामाकरता ७ वर्षासाठी नाममात्र भाडयाने देण्यास मान्यता देण्यात यावी. अशा प्रस्तावांचा समावेश होता.

: प्रशासनाचा अभिप्राय आवश्यक – धनकवडे

मात्र ऐनवेळी दाखल करण्यात आलेल्या या प्रस्तावाबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी आक्षेप घेतला. धनकवडे यांनी हे सर्व प्रस्ताव प्रशासनाचे अभिप्राय घेण्यासाठी पाठवण्याची मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार अशा पद्धतीने कुणालाही जागा देता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाकडे हे प्रस्ताव जायला हवे. मात्र त्यांची ही भूमिका भाजपाला मान्य नव्हती. त्यामुळे त्यावर मतदान घेण्यात आले. अपेक्षेप्रमाणे प्रस्ताव भाजपाच्या बाजूनेच मंजूर झाले. मात्र धनकवडे यांनी आरोप केला कि आगामी काळात आपली सत्ता येणार नाही म्हणून भाजप कसलेही प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेत आहे.
महापालिकेच्या मिळकती अशा पद्धतीने कुणालाही भाडे कराराने देता येणार नाहीत. त्यासाठी प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे आम्ही प्रशासनाचा अभिप्राय घेण्याची मागणी केली. मात्र आगामी काळात आपली सत्ता येणार नाही, असे वाटत असल्याने  भाजप कसलेही प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेत आहे.

       दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक, राष्ट्रवादी.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0