NCP New Chief News | शरद पवार यांचा राजीनामा समितीने फेटाळला | कोण होणार नवीन अध्यक्ष?
NCP New chief news : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन (NCP Chief) पायउतार होण्याचा निर्णय शरद पवार (Sharad pawar) यांनी घेतला आहे, पण त्यांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. शरद पवारांनीच पदावर कायम राहावं, असा प्रस्ताव समितीने मांडला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी या प्रस्ताव मांडला आहे. (NCP New Chief News)
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात सध्या बैठक सुरु आहे. सोळा सदस्यांच्या समितीने पवारांचा राजीनामा फेटाळला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरु आहे. कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या नावानं घोषणा देत आहे. एका कार्यकर्त्याचा यावेळी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Sharad pawar news)
शरद पवार यांनी मंगळवारी पदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. (NCP Sharad pawar)