NCP Against Sadabhau Khot | सदाभाऊ खोत यांच्या विरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे “जोडे मारो” आंदोलन

HomeBreaking Newsपुणे

NCP Against Sadabhau Khot | सदाभाऊ खोत यांच्या विरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे “जोडे मारो” आंदोलन

Ganesh Kumar Mule Jul 10, 2023 2:36 PM

Mahayuti Pune | महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती
Gas Price Hike | गॅस सिलिंडर दरवाढीचा काँग्रेस महिला आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध
NAAC Committee | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयास उद्या नॅक कमिटीची भेट

NCP Against Sadabhau Khot | सदाभाऊ खोत यांच्या विरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे “जोडे मारो” आंदोलन

 

NCP Against Sadabhau Khot | विधानपरिषदेचे माजी आमदार सदाभाऊ खोत (Former MLA Sadabhau Khot) खा. शरद पवार (MP Sharad Pawar) यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट असून आज पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांनी सदा खोत यांच्या फोटोला चप्पल व जोडे मारत आंदोलन (Agitation) केले. यावेळी “सदा खोत मुर्दाबाद” , “अगोदर बिल द्या…मग ज्ञान पाजळा”, “खोताच्या बैलाला घो”, अशा प्रकारच्या घोषणा देत बालगंधर्व रंग मंदिराचा परिसर दणाणून सोडला. (NCP Against Sadabhau Khot)

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President Prashant Jagtap) म्हणाले की,”शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सेटलमेंट करत आमदारकी मिळविणाऱ्या सदा खोत नावाच्या आमदाराने आदरणीय पवारसाहेबांवर अतिशय घाणेरड्या भाषेत टीका केली आहे. टाकलेला तुकडा संपत आला की पुन्हा तुकडा मिळावा यासाठी गेटकडे पाहून रखवालदारीचा आव आणणाऱ्या या प्रवृत्ती केवळ आमदारकीची टर्म संपत आल्याने अशी विधाने करत आहेत. (NCP Pune Sharad Pawar Camp)

“आज सदा खोत यांच्या विरोधात आम्ही निषेध आंदोलन करत केले असलो, तरी भविष्यात जर अशा प्रकारची टीका टीपणी पुन्हा सदा खोत यांनी केली तर आम्ही त्यांच्या चेहऱ्याला काळेफासत त्यांच्या कृत्यांचा निषेध करू”, असा इशारा देखील प्रशांत जगताप यांनी दिला. (NCP Pune News)

आंदोलन प्रसंगी ज्येष्ठ नेते अंकुशअण्णा काकडे, प्रकाशआप्पा म्हस्के, काकासाहेब चव्हाण, उदय महाले, आप्पासाहेब जाधव, मृणालिनीताई वाणी, स्वातीताई पोकळे, प्रभावतीताई भुमकर, नितीनजी कदम, सुषमा सातपुते, किशोर कांबळे, रोहन पायगुडे, दीपक कामठे, आनंदजी सावणे,राजू साने,युसुफ शेख,मनोज पाचपुते ,अनिताताई पवार,तन्वीर शेख, विविध सेलचे अध्यक्ष,कार्याध्यक्ष,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


News Title | NCP Against Sadabhau Khot | Pune Nationalist Congress Party’s “Jode Maro” movement against Sadabhau Khot