Navodaya Vidyalaya Samiti | जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशाकरीता ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
Navodaya Vidyalaya Samiti – (The Karbhari News Service) – जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीच्या वर्गासाठी निवड चाचणीद्वारे प्रवेश देण्यात येणार असून इच्छुकांनी १६ सप्टेंबरपर्यंत www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईनपद्धतीने नोंदणी करावी, असे आवाहन नवोदय विद्यालय समितीचे आयुक्त विनायक गर्ग यांनी केले आहे.
मागील शैक्षणिक वर्षात देशात एकूण 25 लाख 887 विद्यार्थ्यांनी इयत्ता सहावीच्या वर्गाकरीता प्रवेश मिळण्याकरीता नोंदणी केली होती. जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते तसेच त्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधाउपलब्ध करुन देण्यात येतात.
जेनएनव्हीएसटी -२०२५ अंतर्गत नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश मिळण्याकरीता उन्हाळी सत्र १८ जानेवारी रोजी तर हिवाळी सत्र १२ एप्रिल रोजी असे दोन प्रकारे निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीकरीता जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, असेही श्री. गर्ग यांनी कळविले आहे.
COMMENTS