Navale Bridge Accident | नवले पुलावर अपघात | तीन वाहनांनी घेतला पेट | आतापर्यंत ७ लोकांचा मृत्यू

HomeBreaking News

Navale Bridge Accident | नवले पुलावर अपघात | तीन वाहनांनी घेतला पेट | आतापर्यंत ७ लोकांचा मृत्यू

Ganesh Kumar Mule Nov 13, 2025 9:33 PM

SIC Law | RSM | PMC employee | मनपातील कंत्राटी कामगारांनी एस आय सी चे लाभ घ्यावेत
Bonus Circular | PMC Pune | महापालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसचे परिपत्रक (circular) कधी निघणार? | दिवाळी खरेदीसाठी कर्मचाऱ्यांची ऐनवेळेला धावपळ होणार 
Road Work in Sus | पालिकेने केला नाही म्हणून सुस मधील नागरिकांनी रस्ता बनविण्याकरिता घेतला पुढाकार

Navale Bridge Accident | नवले पुलावर अपघात | तीन वाहनांनी घेतला पेट | आतापर्यंत ७ लोकांचा मृत्यू

 

Pune Accident News – (The Karbhari News Service) – आज (गुरुवारी) सायंकाळी ०५•४० वाजता नवले पुलावर अपघात होऊन तीन वाहनांनी पेट घेतला. यात आतापर्यंत ७ लोकांचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती आहे. (Pune News)

अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार वर्दी मिळताच  तात्काळ सिंहगड, नवले, काञज, एरंडवणा टँकर, मुख्यालयातील रेस्क्यु व्हॅन तसेच पीएमआरडीए येथील एक रेस्क्यु व्हॅन व दोन फायरगाडी अशा एकूण 8 अग्निशमन वाहने रवाना झाली होती. घटनास्थळी पोहचताच पाहिले की, दोन कंटेनर व त्यामध्ये चारचाकी वाहन अडकून त्याने ही मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. जवानांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. परंतू, दुर्देवाने या घटनेत कंटेनर मधून दोन पुरुष व कारमधून दोन पुरुष दोन महिला व एक मुलगी असे एकूण 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

उपस्थित नागरिकांकडून समजले की, एका मोठ्या कंटेनरने आग लागण्याआधी मागे बर्‍याच वाहनांना धडक दिली होती आणि त्यामध्ये ही अनेक जण जखमी झाले आहेत.

याठिकाणी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह चार अधिकारी व जवळपास चाळीस जवान कार्यरत होते.

 

 

पुणे महानगरपालिके कडून नवले ब्रिज येथे झालेल्या अपघात स्थळी  मदतकार्य करण्यात येत आहे.

अग्निशमन विभागाकडून आपत्ती व्यवस्थापनास नवले ब्रिज येथे अपघाताची माहिती मिळताच तात्काळ फायर ब्रिगेड च्या तीन फायर इंजिन एक ब्राउझर दोन रेस्क्यू व्हॅन तसेच पीएमआरडीएचे तीन फायर गाड्या व एक ब्राऊजर दोन रेस्क्यू व्हॅन अपघाताच्या ठिकाणी रवाना होऊन तात्काळ रेस्क्यूचे काम सुरू करण्यात आले.
सदर रेस्क्यूच्या दरम्यान आवश्यक असणारी यंत्रसामुग्री जसे की क्रेन्स, जेसीबी व ॲम्बुलन्सेस याची तात्काळ व्यवस्था करून घटनास्थळी रवाना करून त्या ठिकाणी सर्च अंडर रेस्क्यू चे काम सुरू करण्यात आले.

सदर ठिकाणी लायगुडे दवाखाना व कमला नेहरू दावाखाना या ठिकाणावरील ॲम्बुलन्स व डॉक्टर्स च्या टीम्स घटनास्थळी काम करत असून 108 क्रमांकाचे तीन ॲम्बुलन्स, पुणे मनपाच्या पाच ॲम्बुलन्सस कार्यरत आहेत.

घटनास्थळावर पुणे महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे तसेच क्षेत्रीय स्तरावरील उपायुक्त व महापालिका सहाय्यक आयुक्त अभियंते व व सहाय्यक मनुष्यबळ कर्मचारी घटनेच्या ठिकाणी मदतकार्य करत आहेत.

अग्निशमन दलाचे 35 ते 40 जवान तसेच क्षेत्रीय स्तरावरील 100 ते 110 अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी मदत कार्यामध्ये सहभागी आहेत.अपघातात ज्या व्यक्ती जखमी झाल्या आहेत त्यांना Plus हॉस्पिटल, Silver Breach हॉस्पिटल,नवले हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरु आहेत.

सदर हॉस्पिटलमध्ये मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त(इस्टेट) पृथ्वीराज बी.पी., सहायक आरोग्य प्रमुख  संजीव वावरे यांच्या समवेत सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित आहेत.

अतिरिक्त महापालिका आयुक्त(जनरल)  पवनीत कौर  यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन करण्यात येत असून या घटनेची माहिती मा.महापालिका आयुक्त श्री नवल किशोर राम सर यांना देण्यात येत असून त्यांनी याबाबत दिलेल्या आदेशानुसार सर्व कामकाज करण्यात येत आहे. याप्रसंगी पुणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन ची संपूर्ण टीम कार्यरत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात ग्रस्त वाहने आहेत ती वाहने क्रेनने उचलण्याचे काम सुरू आहे. सफाई कर्मचारी यांच्या मार्फत ऑईली रस्ता झालेला असल्याने फायर फियटर लावून रोड स्वछ करण्यात येत आहे. रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याने कामकाज करण्यात अडथळे येत आहेत.

———-

पुण्यातील नवले पुलाजवळ दोन कंटेनरची झालेली धडक आणि त्यामध्ये एका कारचा झालेला भीषण अपघात तसेच त्यानंतर लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी असून मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.

अजित पवार उपमुख्यमंत्री

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0