Naval Kishor Ram IAS | महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पाचे कामकाज वेळेत पूर्ण होण्यासाठी महापालिका आयुक्त स्तरावर वॉररूम!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या विकास कामांचे अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून, पुणे महानगरपालिका निधीमधून तसेच काही संस्थांच्या व कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबीलिटीच्या माध्यमातून विविध प्रकल्प सुरु आहेत. या प्रकल्पांचे कामकाज विहित वेळेत पूर्ण करणे, कामाचा दर्जा अधिक चांगला राहणे, प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करून त्या माध्यमातून नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणेच्या दृष्टीने महापालिका आयुक्त स्तरावर वॉररूम स्थापन करण्यात आली आहे. या बाबतचे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
या वॉररूममधून प्रकल्प विषयक कामकाजासाठी सर्व संबंधित खातेप्रमुख आणि मा.महापालिका आयुक्त यांचेमध्ये समन्वय करणेसाठी उप आयुक्त (वि) यांनी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलीआहे. उप आयुक्त (वि) यांनी त्यांचेकडे यापूर्वी सोपविलेले कामकाज करून सदर वॉररूमचे समन्वयक म्हणून पुढीलप्रमाणे कामकाज करावायचे आहे.
१) उप आयुक्त (वि) यांनी पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या सर्व प्रकारच्या प्रकल्पविषयक कामांचा आढावा संबंधित खातेप्रमुखांच्या मार्फत घेऊन तो मा. महापालिका आयुक्त यांचेकडे दर १५ दिवसांनी सादर करावयाचा आहे.
२) प्रकल्पाशी संबंधित असलेल्या सर्व खात्यांशी समन्वय साधून प्रकल्प विहित वेळेमध्ये पूर्ण करणे, प्रकल्पाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने संबंधित खात्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्याचे निराकरण करणेसाठी खातेप्रमुखांच्या समन्वयाने कार्यवाही करणे, आवश्यकतेनुसार केंद्र / राज्य शासनाच्या विविध विभागांशी, विविध संस्थांशी समन्वय करणेबाबत कार्यवाही करायची आहे.
३) संपूर्ण वॉर रूमचे कामकाज उपायुक्त यांनी महापालिका आयुक्त यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणा खाली करायचे आहे.

COMMENTS