National Senior Body Building Competition | 16व्या नॅशनल सीनियर बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी पुण्याच्या ओंकार नलावडे व शितल वाडेकरची निवड

HomeBreaking News

National Senior Body Building Competition | 16व्या नॅशनल सीनियर बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी पुण्याच्या ओंकार नलावडे व शितल वाडेकरची निवड

Ganesh Kumar Mule Jan 05, 2025 8:18 PM

Warje Ward Office | वारजे येथील गणपती माथा ते शिंदे पूल दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका
Pune PMC Encroachment Action | वारजे येथील मुंबई बेंगलोर हायवे येथे फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई
Shivneri Shree | महाराष्ट्र राज्यस्तरीय शिवनेरी श्री 2024 चा मानकरी ठरला मुंबईचा शशांक वाकडे

National Senior Body Building Competition | 16व्या नॅशनल सीनियर बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी पुण्याच्या ओंकार नलावडे व शितल वाडेकरची निवड

 

Maharashtra Body Building Association – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन (Maharashtra Body Building Association) च्या वतीने सोळाव्या नॅशनल सीनियर बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी (National Senior Body Building Competition) हिंजवडी (Hinjewadi) येथे निवड चाचणी घेण्यात आली. महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून आलेल्या वरिष्ठ महिला व पुरुष खेळाडूंमधून 15 खेळाडूंची निवड करण्यात आली. यामध्ये पुण्यातील ओंकार नलावडे व शितल वाडेकर यांची अटीतटीच्या स्पर्धेमधून निवड झाली. (Maharashtra News)

ओमकार नलावडे हा विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालय चिंचवड या ठिकाणी कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. कामाची जबाबदारी व घरची परिस्थिती यांचा मेळ घालून याने आपली शरिरयष्टी चांगल्या प्रकारे बनवली आहे. त्याचप्रमाणे महिला खेळाडू शितल वाडेकर यांनीही पर्सनल स्पोर्ट्स फिजिक्स ट्रेनिंग देऊन अनेक महिलांना घडवले आहे. त्यांचीही या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील संघटक शरद मारणे, अजय गोळे, किरण जाधव व युनूस काझी यांनी त्यांना या स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.
या टीमचे कोच म्हणून महेश गनगे यांची नियुक्ती करण्यात आली.

या निवड चाचणीसाठी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष मा किरण सावंत, इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे कायदेशीर सल्लागार मा विक्रम रोठे व महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सेक्रेटरी राजेंद्र चव्हाण व खजिनदार अजय गोळे उपस्थित होते.