महापालिकेतील महिला आरोग्य समित्या नावालाच!
: राज्य सरकार कडून आलेला निधी तसाच पडून
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये २४० महिला आरोग्य समिती स्थापन करण्याचे भौतिक उदिष्ट होते. त्यानुसार 240 महिला आरोग्य समिती पुणेमहानगरपालिकेच्या विविध प्रसुतीगृह, दवाखान्यांतर्गत स्थापन करण्यात आलेले आहेत. यामध्ये महापालिकेच्या आशा वर्कर्स सचिव असतात. तर परिसरातील महिला सदस्य असतात. एका समितीत 8 ते 15 सदस्य असणे आवश्यक आहे. प्रत्येक महिला आरोग्य समितीसाठी प्रत्येकी र.रु. ५०००/- संपूर्ण आर्थिक वर्षासाठी मंजूर आहेत. या उपक्रमांतर्गत महिला आरोग्य समितीला कार्यकालीन कामकाजाच्या बैठका घेण्यासाठी व इतर खर्च अदा करण्यासाठी मोबदला देण्यात येतो. त्यानुसार महापालिकेला अडीच लाखाचा निधी प्राप्त झाला होता. मात्र त्यातील फक्त 40 हजार रुपये वापरण्यात आले आहेत. कारण फक्त समित्या स्थापन केल्या आहेत. मात्र त्या कार्यान्वित नाहीत. त्यामुळे कुठलेही काम होताना दिसून येत नाही.
: समितीला या कामांसाठी दिला जातो निधी
किटकनाशक फवारणी, डास उत्पत्ती स्थान के नष्ट करणे इ.
– शहरी भागातील वंचित गटांमध्ये शासन स्तरावरून राबविण्यात येणा-या विविध योजनांबाबत जनजागृती करणे. उदा. जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम इ.
-शहरी भागातील वंचित गटांसाठी स्वच्छ पाणी उपलब्धतेसाठी आवश्यक दुरुस्ती अथवा आवश्यकता असल्यास सावर्जनिक नळ, स्टॅड पोस्ट यांची उपलब्धता करुन देणे.
-सार्वजनिक शौचालयांची आवश्यकता असल्यास किमान दुरुस्ती करणे, जेणेकरुन सार्वजनिक शौचालये कार्यरत राहतील हे पाहावे.
• भिंती रंगविणे, पपेट शोज, फिल्म शोज, या प्रसिध्दी साहित्याच्या माध्यमातून माता बाल संगोपन अथवा हात स्वच्छ धूणे या सारख्या कार्यक्रमांबाबत जनजागृती करणे.
-अंगणवाडीस्तरावर वजन काटा उपलब्ध नसल्यास विकत घेणे अथवा खराब झाला असल्यास दुरुस्त करणे.
-शहरी भागातील वंचित गटांमध्ये अत्यंत दुर्गम परिस्थिती मधील स्त्री अथवा कुटुंब यांना आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध करुन देणे.
-शहरी आरोग्य आणि पोषण दिवसाचे आयोजन करणेसाठी आवश्यक साधन साधनसामग्री उपलब्ध करुन देणे.
• १०२ अथवा १०८ संदर्भ सेवा उपलब्ध नसल्यास तात्काळ संदर्भ सेवेसाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करुन देणे.
– अबंधित निधी खर्चाचे अहवाल व महिला आरोग्य समिती संबंधित सर्व रेकॉर्ड ठेवणेसाठी आवश्यक स्टेशनरी व झेरॉक्स घेणेसाठी खर्च करणे.
महिला आरोग्य समिती निधी खालील बाबींवर खर्च करु नये
-महिला आरोग्य समिती सदस्यांचा प्रवास खर्च करण्यात येऊ नये.
-महिला आरोग्य समितीच्या माध्यमातून दूरध्वनी बीलासाठी खर्च करण्यात येऊ नये.
COMMENTS