महापालिका शाळेचे विद्यार्थी विज्ञान, गणितात होणार ‘परफेक्ट’
| शाळांमध्ये तयार केली जाणार STEM इनोव्हेशन लॅब
पुणे | पुणे महापालिकेच्या (PMC Pune) प्राथमिक शाळेतील (Primary School) विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी महापालिका शाळांमध्ये STEM इनोव्हेशन लॅब तयार करणार आहे. यासाठी 11 लाख 80 हजारांचा खर्च येणार आहे. मध्यवर्ती भांडार विभागाच्या वतीने ही खरेदी केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. (PMC pune)
थिंकर प्लेस प्रा.लि यांनी प्रस्ताव सादर केलेला आहे. हा प्रस्ताव पोर्टेबल इंटिग्रेटेड STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) लॅबसाठीचा आहे. STEM इनोव्हेशन लॅब NEP (नविन शैक्षणिक धोरण २०२०) अटल टिंकरिंग लॅब, मेक इन इंडिया, NIEPP आणि इतर अनेक सरकारी धोरणावर आधारित आहे. स्टेम इन्होवेशन लॅबचा समावेश शालेय विदयार्थ्यांना त्यांच्या प्रचलित अभ्यासक्रमातील मुलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये २४ शिक्षक संच, २४० विदयार्थी किट, १७ प्रकारची विदयार्थी, शिक्षक उपयोगी साधने, १ प्रोजेक्टर आणि १ स्क्रीन, विदयार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक डॅशबोर्डवर १ वर्षाच्या वैधतेसह प्रवेश, विदयार्थी ऑनलाईन लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमव्दारे ई लर्निंग प्रणालीचा वापर करू शकतील. ज्यामध्ये व्हिडीओसह निर्देशात्मक आणि कोडींग मॅन्युअल समाविष्ट आहेत, अंतर्निहित प्रश्न आणि उत्तर सत्राव्दारे पोस्ट – साप्ताहिक मूल्यांकन, साप्ताहिक क्रियाकलाप ट्रॅकिंग आणि प्रगती अहवाल, विदयार्थी प्रति किट, प्रति विदयार्थी २० तास एलएमएस प्रवेश व्हिडीओसह निर्देशात्मक आणि कोडींग मॅन्युअलचा अभ्यास करू शकतील. जे त्यांच्या स्टेम किटशी निगडीत असेल, मुलभूत विज्ञान किट
(भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र), इलेक्ट्रॉनिक्स किटस (सोल्डरिंग, ब्रेडबोर्ड) ऑटोमेशन लॅब, खगोलशास्त्र प्रयोगशाळा, रोबोटिक्स, भविष्यातील ट्रान्सपोर्ट इयत्यादी साहित्याचा समावेश यामध्ये आहे. (pune Municipal corporation)
(भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र), इलेक्ट्रॉनिक्स किटस (सोल्डरिंग, ब्रेडबोर्ड) ऑटोमेशन लॅब, खगोलशास्त्र प्रयोगशाळा, रोबोटिक्स, भविष्यातील ट्रान्सपोर्ट इयत्यादी साहित्याचा समावेश यामध्ये आहे. (pune Municipal corporation)
एका शाळेसाठीच्या लॅबकरिताचा असून त्यासाठी रक्कम रूपये ११,८०,०००/- इतका खर्च आवश्यक आहे. मध्यवर्ती भांडार विभागाकडून टेंडर च्या माध्यमातून ही खरेदी केली जाईल. (stem lab)
थिंकर प्लेसची स्टेम इन्होवेशन लॅब ही लॅब शालेय अभ्यासक्रमाचा विचार करून शास्त्र, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित स्टेम आधारित शिक्षणासाठी विदयार्थ्यांना प्रवृत्त करते. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी जसे की आयटी, रोबोटिक्स, शास्त्र शाखेतील विदया शाखा (रॉकेटस, ड्रोन्स,
सॅटेलाईटस) आणि औद्योगिक इंडस्ट्री ४.० यांचाही समावेश या प्रशिक्षणात अंतर्भूत केला आहे. त्यामुळे विदयार्थी वास्तविक जीवनातील समस्या पर्यावरणाला हानी न पोहोचवता सोडवू शकतील. स्टेम इन्होवेशन
लॅबचा समावेश शालेय विदयार्थ्यांना त्यांच्या प्रचलित अभ्यासक्रमातील मुलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी फायदेशीर ठरेल.
(Science, Technology, Engineering, Maths)