पुणे शहरातील मनपाची उद्याने, जॉगिंग ट्रॅक पूर्ण क्षमतेने चालू करा
: शहर मनसेची महापालिकेकडे मागणी
पुणे : शहरात कोरोनाचा (Corona) कहर असल्यामुळे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) उद्याने (Park’s and jogging track) बंद ठेवण्यात आली होती. सद्यस्थितीत देखील ही उद्याने आणि जॉगिंग ट्रॅक पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत. आता कोरोनाचा कहर कमी झाला आहे. त्यामुळे उद्याने आणि जॉगिंग ट्रॅक पूर्ण क्षमतेने सुरु करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS pune) व महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली आहे.
: लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना होईल लाभ
शहर मनसेच्या पत्रानुसार गेल्या जवळपास दोन वर्षाच्या कालावधीत कोरोनाच्या जागतिक संकटामुळे पुणे शहरातील उद्याने व जॉगिग ट्रॅक बंद अथवा कमी कालावधीसाठी पुर्ण क्षमतेने सुरू नव्हते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे सद्यस्थितीत बरीच उद्याने व जॉगिंग ट्रॅक कोरोनाच्या निर्बंधामुळे कमी कालावधीसाठी सुरू आहेत. परंतु आता शासनाने बऱ्यापैकी निर्बध सर्व स्तरांवर उठवण्यास सुरूवात केली आहे. किंबहुना शिथील केलेले आहेत. शहरातील उद्याने जॉगिंग ट्रॅक व लहान मुलांची किंडांगणे ही आरोग्याच्या दृष्टीने व विरंगुळयाच्या दृष्टीने महत्वाची आहेत. शहरातील कोरोना रूग्ण संख्या व तीचा दर यामध्ये मोठया प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या वतीने आम्ही आपणास या निवेदनाद्वारे विनंती करू इच्छितो की, पुणे शहरातील उद्याने जॉगिंग ट्रॅक व उद्यानातील लहान मुलांची खेळणी यांच्या वेळा पुर्ववत (पुर्ण क्षमतेने) कराव्यात. जेणेकरून पुणे शहरातील नागरीकांना लहान मुलांना व ज्येष्ठ नागरीकांना या सुविधांचा पुरेपुर लाभ घेता येईल.
COMMENTS