PMC : Lok adalat : लोक अदालत मध्ये मनपा अधिकाऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही  : महापालिका कोर्टाने फटकारले 

HomeBreaking Newsपुणे

PMC : Lok adalat : लोक अदालत मध्ये मनपा अधिकाऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही  : महापालिका कोर्टाने फटकारले 

Ganesh Kumar Mule Nov 23, 2021 7:38 AM

Dilip Vede Patil | मा.नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या मागणीला हिरवा कंदील
Water use Charges | पाटबंधारे महापालिकेकडून दुप्पट दराने पाणीपट्टी घेणार  | पाटबंधारेचे महापालिकेला पत्र 
Property Tax : एरंडवणा परिसरात मिळकतकर विभागाची जोरदार कारवाई 

लोक अदालत मध्ये मनपा अधिकाऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही

: महापालिका कोर्टाने फटकारले

पुणे : नागरिकाशी संबंधित काही खटले निकाली काढण्यासाठी लोक  अदालत चे आयोजन केले जाते. यामध्ये महापालिका प्रशासनाचा महत्वपूर्ण रोल असतो. मात्र यामध्ये महापालिका अधिकाऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. अशी तक्रार महापालिका कोर्टाने महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. शिवाय यापुढे आयोजित केलेल्या लोक अदालतीत चांगले काम करावे, असे कोर्टाने सांगितले आहे.

११ डिसेंबर ला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

राज्य विधि सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांनी निर्देषित केल्यानुसार 11 डिसेंबर  रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने
दाखलपुर्व खटले व प्रलंबित खटले जास्तीत जास्त निकाली काढणे आवश्यक आहे.  याबाबत आज एक बैठक आयोजित केली होती. त्यासाठी खातेप्रमुखाना उपस्थित राहण्यास सांगितले आहे. दरम्यान महापालिका दिवाणी न्यायालयाने मागील अदालती बाबत आयुक्ताकडे तक्रार केली होती. कोर्टाच्या म्हणण्यानुसार विशेष नमुद करण्यासारखी बाब अशी की, मागील लोक अदालतीमध्ये दाखलपुर्व खटले निकाली काढण्यासाठी महापालिकेच्या संबंधित अधिका-यांकडुन योग्य असा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे सदर प्रकरणे अत्यंत कमी प्रमाणात निकाली निघाली आहेत. सबब, याची नोंद वरिष्ठापर्यंत घेण्यात आली आहे. तरी आपणांस पुन्हा विनंती की, संबंधित अधिका-यांना योग्य ते निर्देष द्यावे. त्यानुसार आज हि बैठक घेण्यात आली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0