Dr. Ashish Bharti | महापालिका आरोग्य अधिकारी डॉ आशिष भारती यांची अखेर बदली   | राज्य सरकारकडून आदेश जारी

HomeपुणेBreaking News

Dr. Ashish Bharti | महापालिका आरोग्य अधिकारी डॉ आशिष भारती यांची अखेर बदली | राज्य सरकारकडून आदेश जारी

Ganesh Kumar Mule Mar 01, 2023 2:16 PM

Health Schemes : PMC : आधुनिक उपचार हवाय तर मग खिशातले पैसे भरा; महापालिकेवर अवलंबून राहू नका 
World AIDS Day | जागतिक एड्स दिनानिमित्त महापालिकेकडून पोस्टर व रांगोळी प्रदर्शन 
Grant of PMC Medical college : अखेर महापालिकेचे मेडिकल कॉलेज आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न! : विद्यापीठाने मेडिकल कॉलेजला दिली मंजुरी 

महापालिका आरोग्य अधिकारी डॉ आशिष भारती यांची अखेर बदली

| राज्य सरकारकडून आदेश जारी

पुणे | महापालिकेत प्रतिनियुक्ती वर आलेले आरोग्य अधिकारी तथा आरोग्य विभाग प्रमुख डॉ आशिष भारती यांची अखेर बदली करण्यात आली आहे. राज्य सरकार कडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. डॉ भारती यांची सरकारच्या उपसंचालक, आरोग्य सेवा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान महापालिकेचे आरोग्य प्रमुख पद पुन्हा रिक्त झाले आहे. त्यामुळे ही जबाबदारी आता उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांना दिली जाईल, अशी चर्चा केली जात आहे.

सरकारच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी या संवर्गातील डॉ. आशिष हिरालाल भारती यांची दि.३०.०९.२०२० च्या शासन आदेशान्वये पुणे महानगरपालिकेच्या “आरोग्य वैद्यकीय अधिकारी” या पदावर एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली. तदनंतर, दि.०८.०२.२०२२ च्या आदेशान्वये डॉ. आशिष भारती यांच्या प्रतिनियुक्तीस दि.०५.१०.२०२१ पासून पुढे एक वर्ष म्हणजेच दि.०४.१०.२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती.

आदेशात पुढे म्हटले आहे कि, आता, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या मान्यतेनुसार डॉ. आशिष हिरालाल भारती यांची पुणे महानगरपालिकेच्या “आरोग्य वैद्यकीय अधिकारी” या पदावरील प्रतिनियुक्ती दि.०१.०३.२०२३ (म.नं.) पासून संपुष्टात आणण्यात येत आहे. त्यानुसार डॉ. आशिष हिरालाल भारती यांनी पुढील आदेश होईपर्यंत त्यांच्याकडील पुणे महानगरपालिकेच्या “आरोग्य वैद्यकीय अधिकारी” या पदाचा कार्यभार महानगरपालिकेतील सक्षम प्राधिकारी यांच्याकडे तात्काळ सुपूर्द करून उप संचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे यांच्या कार्यालयात हजर व्हावे.