महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना स्वछता ऍप डाउनलोड करणे बंधनकारक
: स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत प्रथम येण्याचे उद्दिष्ट्य
: सर्व विभागाकडून मागवली माहिती
महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सन २०१६ पासून गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयामार्फत भारतातील विविध शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा घेण्यात येते. या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू आहे कि, व्यापक स्वरूपात नागरिकांचा सहभाग वाढविण्यास उदयुक्त करणे आणि समाजाच्या सर्व स्तरावरील लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, जेणेकरून सांधिक कार्याचे महत्व पटवून शहरातील वास्तव्य अधिक सुखरूप होईल. याशिवाय शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा पुरविण्याच्या बाबतीत शहरांमध्ये निकोप स्पर्धेची प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने च्या पत्रान्वये केंद्र सरकारकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२२ स्पर्धेची घोषणा करण्यात आली असल्याने, पुणे महानगरपालिकेस यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानांकन, water plus व ७ स्टार मानांकन प्राप्त करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुषंगाने पुणे शहर प्रथम क्रमांकावर येणेसाठी शहर स्वच्छ व सुंदर राखणे आवश्यक असून त्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी / कर्मचारी यांचे योगदान मोलाचे आहे. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिकेत सर्व विभागातील अधिकारी / कर्मचारी यांनी स्वच्छता अॅप (Swachhata-MOHUA)
डाऊनलोड केले असलेबाबतची एकत्रित माहिती संबंधित विभागाने घनकचरा व्यवस्थापन कार्यालय, पुणे महानगरपालिका यांना कळविण्याची दक्षता घ्यावी. असे आदेशात म्हटले आहे.
COMMENTS