पुण्यासह सर्वच महापालिकांची नव्याने होणार प्रभाग रचना
| राज्य सरकारचे आदेश | महाविकास आघाडीला झटका
पुणे महापालिकेसह (PMC Pune) राज्यातील २४ महापालिकांच्या निवडणुका (Municipal Elections) घेण्यासाठी या सर्व महापालिकांची प्रभाग रचना नव्याने करण्याची आदेश राज्य सरकारने काढले. निवडणुका विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये रखडलेल्या असताना राज्य सरकारने महापालिकांची नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश काढले आहेत. या निर्णयामुळे महापालिकांच्या निवडणुका आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. (PMC election)
दरम्यान, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात सुनावणी होणार असतानाच आधीच्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सरकारने तयार केलेली प्रभाग रचना नव्याने बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील २४ महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने मंगळवारी काढले. मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी शेवटच्या जनगणनेनुसार प्रभागातील सदस्यांची संख्या आणि रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ सुरु करण्यात यावी, अशा सूचना नगरविकास विभागाने संबंधित महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.