Property Tax : Vilas Kanade : महापालिकेचा मिळकतकर विभाग रचत चालला इतिहास : पहिल्या १८ दिवसात मागील वर्षी पेक्षा ५१ कोटी जास्त मिळवले

HomeपुणेBreaking News

Property Tax : Vilas Kanade : महापालिकेचा मिळकतकर विभाग रचत चालला इतिहास : पहिल्या १८ दिवसात मागील वर्षी पेक्षा ५१ कोटी जास्त मिळवले

Ganesh Kumar Mule Apr 18, 2022 3:08 PM

PMC Commissioner Vikram Kumar | उत्पन्न वाढीसाठी नियोजन करा  | महापालिका आयुक्तांच्या टॅक्स विभागाला सूचना 
Traffic Congestion in Vadgaonsheri | वडगावशेरी मतदारसंघातील वाहतूक कोंडी |आमदार सुनिल टिंगरे यांच्याकडून विविध ठिकाणी पाहणी
Discharge water from Khadakwasla Dam | खडकवासला धरणातून २५६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग 

१८ दिवसात १७१ कोटींचा मिळकतकर जमा

: मागील वर्षी पेक्षा ५१ कोटी जास्त मिळवले

पुणे : महापालिकेचा मिळकतकर विभाग दरवर्षी वसुलीचे इतिहास रचत चालला आहे. विभागाने यावर्षी तर पहिल्याच १८ दिवसात सुमारे १७१ कोटींचा मिळकतकर जमा केला आहे. मागील वर्षी एवढ्या दिवसात १२० कोटी मिळाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ५१ कोटी जास्त मिळाले आहेत. विभागाच्या अथक प्रयत्नामुळे हे शक्य होत आहे. अशी माहिती विभाग प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

 

कानडे यांच्या माहितीनुसार  सुमारे८०% इतकी रक्कम ऑनलाईन प्रणालीद्वारे जमा झालेली आहे. म्हणजे १३३  कोटी ऑनलाईन च्या माध्यमातून जमा झाले आहेत. १ लाख २२ हजार ६४६ इतक्या लोकांनी ऑनलाइन माध्यमातून मिळकतकर जमा केला आहे. कॅश आणि चेक च्या माध्यमातून प्रत्येकी १३% इतकी रक्कम जमा केली आहे. कानडे यांनी सांगितले कि विभागाने यावर्षी तर पहिल्याच १८ दिवसात सुमारे १७१ कोटींचा मिळकतकर जमा केला आहे. मागील वर्षी एवढ्या दिवसात १२० कोटी मिळाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ५१ कोटी जास्त मिळाले आहेत.

२०२२-२३ चा मिळकत कर जमा करता यावा, यासाठी खात्याकडे उपलब्ध असलेल्या भ्रमणध्वनीच्या आधारे ८,८८,२०७ इतक्या मिळकतधारकांना एसएमएसद्वारे लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच ६,६९,५१२ इतक्या मिळकतधारकांना कर भरणे बाबत इमेलद्वारे कळविणेत आले आहे. ज्या मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम रु.२५,०००/- पेक्षा कमी आहे, अशा मिळकतधारकांना मिळकत कराच्या सर्व साधारण करामध्ये १०% इतकी सूट, तर ज्या मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम रु. २५,००१/- पेक्षा जास्त आहे, अशा मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतकराच्या सर्व साधारण करामध्ये ५% इतकी सवलत देण्यात येत आहे. सदरची सवलत ही दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे तत्पूर्वी मिळकतधारकांनी त्यांचा मिळकत कर जमा करावा, असे आवाहन कानडे यांनी केले आहे.

Property Tax Collection

From 1-04-2022

CASH ➡️ 20,494 (13%)
14.59 Cr (9%)

CHEQUE ➡️ 10,797(7%) Rs 22.51 Cr (13%)
ONLINE ➡️ 1,22,646(80%)
Rs 133.9 Cr (78%)

Total Tax Payers 1,53,937
Total amount Rs 171 Cr

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0