समाविष्ट गावांतील समस्यांबाबत महापालिका आणि PMRDA ची उद्या बैठक
पुणे | महापालिका हद्दीत गावे समाविष्ट झाल्यापासून PMRDA आणि महापालिका यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून आले आहे. 11 गावाचा विकास निधी महापालिकेला देणे असो अथवा 34 गावातील जागा ताब्यात घेणे असो, यात अडचणीच आल्या आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आणि PMRDA या दोन्ही संस्थांची संयुक्त बैठक होणार आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयात ही बैठक होईल. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
खालील विषयांवर चर्चा करण्याकरिता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे व पुणे महानगर पालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.
१) प्रारंभिक म्हाळुंगे- माण नगर रचना क्र.०१ करिता पाणी पुरवठाबाबत.
२) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामधून पुणे महानगर पालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या ११ गावातील विकास निधी देणेच्या मनपाचे विनंतीबाबत..
३) पुणे महानगर पालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या सुविधा क्षेत्र व रस्ता क्षेत्र पुणे महानगर पालिकेच्या ताब्यात द्यावयाच्या जागेमधील अडचणीबाबत.