लसीकरण केंद्रावर काम करणारे मनपा आणि पीएमपी चे कर्मचारी कार्यमुक्त
: महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
पुणे : शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये लसीकरण केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. त्यानुसार लसीकरण केंद्र, मुख्य लसीकरण कार्यालय व लसीकरण बूथ या ठिकाणी पी.एम.पी.एम.एल.कडील कर्मचारी तसेच पुणे महानगरपालिकेकडील सेवक यांची वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशान्वये नेमणूक करण्यात आली आहे. मुख्य लसीकरण कार्यालय, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका येथे कामकाज करीत असलेले पुणे महानगरपालिकेकडील सेवक वगळून, इतर सर्व लसीकरण केंद्र येथे पुणे महानगरपालिकेच्या विविध खात्याकडून उपलब्ध करून घेतलेले (आरोग्य विभागाव्यतिरिक्त ) सर्व सेवक यांना या आदेशान्वये त्यांचे मुळ खात्यात कामकाजासाठी कार्यमुक्त करण्यात येत आहे. असे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत.
—
COMMENTS