Hirkani kaksh | महापालिका महिला कर्मचाऱ्यांविषयी मनपा प्रशासनाची अनास्था!   | वर्षभरापासून हिरकणी कक्ष बंद | महिला आयोगाच्या पत्राची देखील दखल नाही

HomeBreaking Newsपुणे

Hirkani kaksh | महापालिका महिला कर्मचाऱ्यांविषयी मनपा प्रशासनाची अनास्था! | वर्षभरापासून हिरकणी कक्ष बंद | महिला आयोगाच्या पत्राची देखील दखल नाही

Ganesh Kumar Mule Apr 10, 2023 3:16 PM

PCMC – Nigdi Metro | PCMC ते निगडी विस्तारित मेट्रो मार्गाला केंद्र सरकारची मान्यता 
Pune Municipal Corporation | उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुणे महानगरपालिकेचा गौरव
Arvind Shinde | Pune Congress | आज भाजपाला ‘चले जाव’ म्हणण्याची गरज आहे | अरविंद शिंदे

महापालिका महिला कर्मचाऱ्यांविषयी मनपा प्रशासनाची अनास्था!

| वर्षभरापासून हिरकणी कक्ष बंद | महिला आयोगाच्या पत्राची देखील दखल नाही

पुणे | महापालिकेतील हिरकणी कक्ष वर्षभरापासून बंद आहे. यामुळे महिला कर्मचारी व महिला अभ्यागतांची गैरसोय होत आहे. महापालिका प्रशासनाला मात्र याबाबत कसलीही आस्था दिसून येत आहे. याबाबत तक्रारी करूनही आणि विशेष म्हणजे महिला आयोगाने आदेश देऊनही महापालिकेने कुठलेही पाऊल उचलले नाही. महापालिका आयुक्त आणि प्रशासनाची याबाबत आलोचना केली जात आहे. (Pmc Pune)

हिरकणी कक्ष बंद असल्याबाबतची माहिती सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकर यांनी उजेडात आणली होती. त्याबाबत त्यांनी महापालिका आयुक्ताकडे तक्रार केली होती. याबाबत वेलणकर यांनी सांगितले कि, महापालिकेतील मुख्य इमारतीतील महिला कर्मचारी तसेच महापालिकेत कामानिमित्त येणाऱ्या महिला नागरीक यांच्यासाठी २०१६ साली गाजावाजा करुन उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष गेल्या काही महिन्यांपासून गायब झाला आहे. याठिकाणी स्तनदा मातांना बालकांना दूध पाजण्याची व्यवस्था तसेच कुणा महिलेला बरे नाहीसे वाटायला लागले, तर थोडा वेळ विश्रांती घेण्याची सोय होती. महापालिका मुख्य इमारतीतील तळनजल्यावर हा कक्ष उभारण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी तिथे दिव्यांग कक्ष सुरु करण्यात आला व हिरकणी कक्ष इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील काका वडके सभागृहाशेजारील खोलीत कागदोपत्री हलवण्यात आला. त्या नवीन जागेची पाहणी केली असता असे दिसून आले की तेथे हिरकणी कक्षाचा बोर्डही नाही व व्यवस्था ही नाही. त्या ठिकाणी मालमत्ता विभागाच्या फायली पडल्या आहेत आणि त्या विभागाचे दोन कर्मचारी तिथे काम करीत आहेत. महापालिका प्रशासन आपल्याच महिला कर्मचारी व महिला नागरीक यांच्याविषयी किती संवेदना शून्य आहे हे यातून उभे राहणारे चित्र व्यथित करणारे आहे. या संदर्भात २१ डिसेंबर २०२२ रोजी सोबत जोडलेले पत्र पुणे महापालिका प्रशासकांना पाठवले होते. त्यानंतर स्मरणपत्र ही दिले होते, मात्र उपयोग शून्य. (Pune municipal corporation)

 विवेक वेलणकर यांनी पुढे सांगितले कि, त्यानंतर आम्ही याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे केली. आयोगाने तात्काळ याची दखल घेत महापालिकेला याचा अहवाल देण्यास सांगितले. मात्र दोन महिने उलटून गेले तरी महापालिका प्रशासनाने याबाबत कुठलीही हालचाल केलेली नाही. आमची मागणी आहे की या तक्रारीमध्ये लक्ष घालून हा हिरकणी कक्ष सर्व सुविधांनिशी तातडीने सुरु करावा.
—-
महापालिकेतील हिरकणी कक्ष गेल्या वर्षभरापासून बंद आहे. याबाबत महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रारी करूनही काही उपयोग झाला नाही. म्हणून आम्ही राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. मात्र महिला आयोगालाही कुठले उत्तर देण्यात आलेले नाही. यावरून आपल्याच महिला कर्मचाऱ्याविषयी महापालिका आयुक्त आणि प्रशासन किती उदासीन आहे. हे दिसून येत आहे.
विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच, पुणे.