Mukhyamantri Majhi Ladki Bahin | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर त्याला शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल |  डॉ. नीलम गोऱ्हे

HomeपुणेBreaking News

Mukhyamantri Majhi Ladki Bahin | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर त्याला शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल |  डॉ. नीलम गोऱ्हे

गणेश मुळे Jul 20, 2024 3:10 PM

Koos | सरकारची स्मरणशक्ती जागृत ठेवण्यासाठी ‘कूस’ उपयुक्त
Pune Rain | महापालिका प्रशासनाने बाधित कुटुंबांचे पंचनामे लवकर करून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी | डॉ. नीलम गोऱ्हे
Pune Bopdev Ghat Incident | निर्जन स्थळी पोलीस चौकी अद्ययावत कराव्यात, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, गस्त घालते वेळी सायरनचा वापर करा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर त्याला शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल |  डॉ. नीलम गोऱ्हे

| शासकीय योजनांची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकर परिषदेत दिली माहिती

 

Dr Neelam Gorhe – (The Karbhari News Service)-  विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात राबविल्या जाणाऱ्या शासकीय योजनांची माहिती यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune Shivsena)

पुण्यातील सारसबाग रोडवरील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय इथे आज  रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी अधिवेशनात सभागृहात मांडलेल्या लक्षवेधी योजना आणि सूचना यांची माहिती दिली. तसेच सरकार अमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करत आहे.

याप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेची सभासद नोंदणी मोहीम जोरात सुरू असून, आतापर्यंत पुण्यात २५ हजार सभासद नोंदणी झाले असल्याचे नमूद केले.

डॉ. गोऱ्हे यांनी मंजूर केलेल्या विधेयकांची माहिती दिली. यामध्ये कॉपी विरोधात विधेयक आणि ६ महिन्याच्या आत कुठलाही विकास आराखडा मंजूर करावा असे विधेयक मंजूर केले.अशी माहिती डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत जर कोणी भ्रष्टाचार करू पाहत असेल, तर त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर दिल्या जाईल असा इशारा यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी दिला.

यावेळी अनेक महिलांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रवेश केले.

यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, उपशहर प्रमुख विकी माने, सुनिल जाधव, सुधीर कुरूमकर, उपजिल्हा प्रमुख अमर घुले, महिला आघाडी सह संपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, महिला आघाडी शहर प्रमुख सुरेखा पाटील, श्रुती नाझिरकर, श्रद्धा शिंदे व नेहा शिंदे, महिला आघाडी उपशहर प्रमुख जयश्री मोरे, स्मिता साबळे, सारिका पवार, राजश्री माने, प्रतिमा बोबडे, धनंजय जाधव, महेंद्र जोशी, पंकज कोद्रे, शीतल गाडे, आशा यादव व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.