तारादूत सुरु करण्यासाठी मराठा संघटनाचे आंदोलन
: सारथी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
पुणे : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच शाश्वत विकासासाठी, सारथीच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी तारादूत प्रकल्प हा महत्त्वाचा आहे. अजितदादा पवार यांनी दिनांक 19 जून 2021 रोजी झालेल्या बैठकीत तारादूत प्रकल्प तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते. तरी आज चार महिने पूर्ण होत आहे तरी पण तारादूत प्रकल्प हा सुरू झालेला नाही.त्यामुळे विवीध मराठा संघटना तसेच मराठा क्रांती मोर्चा 20 आॕक्टोंबर पासून सारथी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करत आहेत. अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक सचिन आडेकर यांनी दिली.
: उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश
याबाबत सचिन आडेकर यांनी सांगितले कि दिनांक १९/०६/२०२१ रोजी मा. अजित दादा पवार, युवराज छत्रपती संभाजी राजे, मराठा क्रांती मोर्चा सर्व समन्वयक, तारादुत प्रतीनीधी तसेच सारथी संचालक मंडळ यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये मा. अजित दादानी तारादुत प्रकल्प सुरु करण्याचे आदेश देउनही तारादुत प्रकल्प अद्यापही सुरु झालेला नाही. सारथीच्या योजनेला वेळोवेळी मुदतवाढ द्यावी लागत आहे. यासाठी तारादुत प्रकल्प हा महत्वाचा आहे. तारादुत प्रकल्प तात्काळ सुरु करुन सर्व प्रशिक्षीत तारादुतांना सारथी अंतर्गत किवा बाहय स्त्रोतामार्फत नियुक्तया देण्यात याव्या. अन्यथा सर्व मराठा संघटनांना सोबत घेउन तारादुत दिनांक २०/१०/२०२१ पासुन सारथी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत. असा इशारा आम्ही दिला होता. त्यानुसार आम्ही हे आंदोलन सुरु केले आहे. असे ही आडेकर म्हणाले.
COMMENTS