Monsoon 2023 | आनंदाची बातमी | मान्सून संपूर्ण राज्यात दाखल | हवामान विभागाची घोषणा 

HomeBreaking Newsपुणे

Monsoon 2023 | आनंदाची बातमी | मान्सून संपूर्ण राज्यात दाखल | हवामान विभागाची घोषणा 

Ganesh Kumar Mule Jun 25, 2023 9:14 AM

Pune Rain | भारतीय हवामान खात्याकडून पुणे आणि सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रशासनाला युद्धपातळीवर सतर्क राहण्याचे आदेश
Pune Rain News | 24 व 25 ऑगस्ट रोजी पावसाचा रेड अलर्ट | हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा
Monsoon Update | हवामान विभागाचा अंदाज | येत्या ४,५ दिवसांत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

| हवामान विभागाची घोषणा

Monsoon 2023 | सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मान्सूनने (Monsoon) आज संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) व्यापला आहे. भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) याबाबतची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरचा काही भाग सोडता संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. यामुळे मात्र शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांना चांगला दिलासा मिळाला आहे. (Monsoon 2023)

 

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरात पुढील दोन दिवसात मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. सध्या राज्याच्या काही भागात पाऊस कोसळत आहे. अद्याप काही ठिकाणी पावसाची  प्रतिक्षा कायम आहे. (Maharashtra Rain)

पुण्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

पुण्यात 24 जून ला जोरदार पाऊस झाला. 25 आणि 26 ला देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार रविवार सकाळपासूनच पुण्यात पाऊस कोसळत आहे. (Pune Rain)

—-

News Title | Monsoon 2023 | Good News | Monsoon has entered the entire state | Announcement of Meteorological Department