Mahamadwadi Water Issue | महंमदवाडी कौसरबाग परिसरात होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्या वरून शिवसेना करणार आंदोलन   | शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची माहिती

HomeपुणेBreaking News

Mahamadwadi Water Issue | महंमदवाडी कौसरबाग परिसरात होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्या वरून शिवसेना करणार आंदोलन | शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची माहिती

गणेश मुळे Apr 05, 2024 12:58 PM

PMC Water Supply Department | पाणीपुरवठा विभागाकडून रोटेशन नुसार पाणीकपात करण्याचा निर्णय रद्द 
PMC Water Supply Department | येत्या शनिवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद! 
Pune Water Cut News | पुण्यातील काही भागात गुरुवारी 24 तास पाणीपुरवठा बंद!

Mahamadwadi  Water Issue | महंमदवाडी कौसरबाग परिसरात होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्या वरून शिवसेना करणार आंदोलन

| शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची माहिती

Pramod Nana Bhangire- (The Karbhari News Service) प्रभाग क्र.२६ महंमदवाडी कौसरबाग  मध्ये कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने 10 एप्रिल रोजी महापालिका भवन मध्ये तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत प्रशासनाला सोमवार पर्यंतची मुदत दिली आहे. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली. तसेच याबाबत महापालिका प्रशासनासोबत देखील पत्रव्यवहार करण्यात आला आहे. (PMC Water Supply Department)

भानगिरे यांच्या निवेदनानुसार प्रभाग क्र.२६, महंमदवाडी कौसरबाग हा प्रभाग लोकसंखेच्या व क्षेत्रफळाच्या दृष्टिने सर्वात मोठा प्रभाग आहे. बऱ्याच महिन्यापासून प्रभागात पाणीपुरवठा कमी दाबाने व अवेळी होत आहे. अनेक भागांमध्ये मध्यरात्री, अपरात्री, पहाटे पाणीपुरवठा  केला जातो. अवेळी पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दोराबजी परिसर, क्लाऊड नाईन, चिंतामणी नगर, गुलाम आली नगर, ससाणे
वस्ती,काळेपडळ,बडदे मळा, दुगड चाळ, हांडेवाडी रोड,ईसीपी वास्तू ड्रीम इस्टेट, ग्रीन सिटी, नमो विहार, ईशरथ बाग,पांगारे मळा, सनश्री साळुंखे विहार, काळेपडळ, महंमदवाडी गावठाण, संपूर्ण हांडेवाडी रोड व इतर भागांमध्ये पाणी वेळेवर न येणे व कमी दाबाने येत आहे.

भानगिरे यांनी पुढे म्हटले आहे कि, विभागातील संबधित अधिकारी यांना वारंवार सूचना देऊन देखील याबाबतीत कोणत्याही समस्येचे निवारण केलेले नाही. या कारणास्तव सर्व नागरीक अतिशय त्रस्त झाले आहेत. बऱ्याच वेळा आम्ही तक्रार करुन काही निष्पन्न झाले नाही. माझ्या प्रभागामध्ये सर्व परिसरातील सोसायटी नागरिक नियमित टॅक्स भरत असतात तरीही त्यांना पानी पुरवठा सुरळीत होत नाही. टँकर देखील अपुरे दिले जातात. तरी प्रभाग क्र 26 महंमदवाडी- कौसरबाग चा पाणी पुरवठा येत्या सोमवार पर्यंत सुरुळीत न केल्यास तसेच वाढीव नाही दिल्यास आपल्या कार्यालयावर शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईल नुसार भव्य मोर्चा काढून कार्यालयास टाळे ठोकले जातील व आपणास घेराव घालुन जाब विचारल्याशिवाय नागरीक राहणार नाहीत. आम्ही आंदोलन प्रसंगी होणाऱ्या परिणामास आपण व आपले कार्यालय जबाबदार राहील. असेही भानगिरे यांनी म्हटले आहे.