MNS Pune | Pune Metro | पुणे मेट्रो स्थानकाची नावे छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा जोतिबा फुले मंडई स्थानक करा
| पुणे शहर मनसेची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी
MNS Pune | Pune Metro |महाराष्ट्र राज्यात पुणे शहराची ओळख शैक्षणीक,सांस्कृतीक अशी आहे. या मध्यवर्ती भागातील मेट्रो स्थानकच्या नावात आपला ऐतिहासीक वारसा जपण्याची परंपरा कायम रहावी. याकरिता या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्थानक (Chhatrapati Shivaji Maharaj Metro Station) व मंडई भागातील स्थानकाचे नाव महात्मा जोतिबा फुले मंडई स्थानक (Mahatma Jyotiba Phule Mandai Station) असेच ठेवण्यात यावे. ऐतिहासिक वारसा परंपरा जपणे हाच मुख्य उद्देश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (Maharashtra Navnirman Sena) आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकाच्या नावाची अधिकृत घोषणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS Pune) वतीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे करण्यात आली आहे. (MNS Pune | Pune Metro)
मनसे च्या निवेदनानुसार पुण्यात गेल्या दशकात उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा आणि नोकरीच्या संधींमुळे भारताच्या विविध भागांतून स्थलांतरित झालेल्या लोकसंख्येमध्ये वाढ झाली आहे. शहराचे संशोधन आणि विकास संस्था, आयटी पार्क आणि ऑटोमोबाईल उद्योगांतील नोकरदार, विध्यार्थी घटकांना सुलभ वाहतुकीसाठी शासनाच्या पुणे मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी वाहतूक व्यवस्थेची काळाची गरज ओळखून पुणे मेट्रो प्रकल्प सुरू झाला. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या फेज-1 ,2,3 मध्ये पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात कामगार पुतळा,दिवाणी न्यायालया जवळ स्थानकाची उभारणी करण्यात आली आहे प्रशासनाने या स्थानकांची नावे शिवाजी नगर व मंडई अश्या चुकीच्या ऐकेरी नावे केल्यामुळे चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकाच्या नावाची अधिकृत घोषणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
News Title |MNS Pune | Pune Metro | Name the Pune Metro Station Chhatrapati Shivaji Maharaj and Mahatma Jotiba Phule Mandai Station | Demand of Pune City MNS to Municipal Commissioner