MLA Sunil Tingre | वडगावशेरी परिसरातील पाणी टंचाई वरून आमदार सुनिल टिंगरे यांचा आंदोलनाचा इशारा! 

HomeBreaking Newsपुणे

MLA Sunil Tingre | वडगावशेरी परिसरातील पाणी टंचाई वरून आमदार सुनिल टिंगरे यांचा आंदोलनाचा इशारा! 

गणेश मुळे Apr 17, 2024 11:53 AM

Punitive tax relief should be given to all Pune city  | MLA Sunil Tingre’s demand to Ajit Pawar
MLA Sunil Tingre | PMC Pune | विश्रांतवाडी चौकातील बुध्द विहार स्थलांतरित करण्यास परवानगी | आमदार सुनिल टिंगरे यांच्या पाठपुराव्याला यश
MLA Sunil Tingre | प्रवाशांच्या सोईसाठी मेट्रो विमानतळापर्यंत जोडावी | आमदार सुनिल टिंगरेंची विधानसभेत मागणी

MLA Sunil Tingre | वडगावशेरी परिसरातील पाणी टंचाई वरून आमदार सुनिल टिंगरे यांचा आंदोलनाचा इशारा!

| महापालिका आयुक्तांना दिले पत्र

MLA Sunil Tingre – (The Karbhari News Service) – वडगावशेरी मतदारसंघातील (Vadgaonsheri Constituency) वडगावशेरी, खराडी, खांदवेनगर व विमाननगर या भागात नियमीत व सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आमदार टिंगरे यांनी दिला आहे.  (PMC Water Supply Department)

टिंगरे यांच्या पत्रानुसार वडगावशेरी मतदारसंघातील, वडगावशेरी, खराडी, खांदवेनगर व विमाननगर या भागांमध्ये मागील दोन महिन्यांपासून, अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत आहे. त्याबाबत स्थानिक नागरीक वारंवार मनपा प्रशासनास व माझ्याकडे तक्रारी व विनंती करत आहेत. माझ्या कार्यालयाकडूनही सदर भागातील कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता यांना वारंवार तक्रारी / सुचना देऊनही या भागातील पाणीपुरवठयाची समस्या सोडविणेबाबत मनपा प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई करण्यात येत नाही. (Pune Water Issue)
आमदार टिंगरे यांनी पुढे म्हटले आहे कि, सद्यस्थितीत उन्हाळा चालू असून नागरीकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याने, नागरीकांमध्ये मनपा प्रशासना विरोधात तिव्र असंतोष पसरला आहे. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास, स्थानिक नागरीक मनपा प्रशासना विरोधात तिव्र आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. तरी वडगावशेरी, खराडी, खांदवेनगर व विमाननगर या भागातील पाणी पुरवठ्याच्या समस्येचे निवारण होणेबाबत आपल्या स्तरावर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा सदर भागातील नागरीकांसह मनपा प्रशासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा टिंगरे यांनी दिला आहे.