MLA Siddarth Shirole | शिवाजीनगर विधानसभा : कॉंग्रेस मधील बंडखोरी भाजपच्या फायद्याची ठरू शकते का! 

HomeBreaking News

MLA Siddarth Shirole | शिवाजीनगर विधानसभा : कॉंग्रेस मधील बंडखोरी भाजपच्या फायद्याची ठरू शकते का! 

Ganesh Kumar Mule Nov 11, 2024 3:20 PM

Pankaja Munde | आम्ही प्रत्येक निवडणूक चुरशीची समजून लढवत असतो | पंकजा मुंडे
NCP Vs BJP | कमळ चिखलात फुलते गाळात नाही; पावसाने भाजपची चांगलीच पोलखोल | राष्ट्रवादीची टिका
Anurag Thakur | BJP | राजकारणा बरोबर अन्य क्षेत्रांत संपर्क वाढवा | अनुराग ठाकूर

MLA Siddarth Shirole | शिवाजीनगर विधानसभा : कॉंग्रेस मधील बंडखोरी भाजपच्या फायद्याची ठरू शकते का!

 

Shivajinagar Vidhansabha – (The Karbhari News Service) – शिवाजीनगर मतदारसंघात काॅंग्रेसमध्ये झालेल्या बंडखाेरीमुळे भाजपने सुस्कारा साेडला आहे.  मतदारसंघात भाजप आणि काॅंग्रेस या दाेन्ही पक्षांचा मतदार माेठ्या प्रमाणावर असल्याने येथील लढत चुरशीची ठरणार, असे मानले जात होते. मात्र काॅंग्रेसमध्ये बंडखाेरी झाली आहे. त्याचा फायदा भाजपला होईल. असे मानले जात आहे. काॅंग्रेसचे बंडखाेर उमेदवार किती मते मिळविणार यावर या मतदारसंघाचे भवितव्य अवलंबून आहे. (Pune Election News)

भाजपकडून या मतदारसंघात विद्यमान आमदार सिद्धार्थ शिराेळे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे.  ही लढत दुरंगी हाेण्याची चिन्हे असतानाच, काॅंग्रेसमध्ये बंडखाेरी झाली आहे. शिरोळे यांची लढाई दत्खता बहिरट यांच्यासोबत होईल, असे मानले जात होते. मात्र खडकी कॅन्टाेन्मेट बाेर्डाचे माजी उपाध्यक्ष मनिष आनंद यांनी बंडखाेरी केली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. त्यामुळे मनिष आनंद यांची उमेदवारी ही काॅंग्रेसला धाेकादायक ठरण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात २००९ साली विनायक निम्हण हे निवडून आले हाेते. त्यांना ५० हजार ९१८ मते मिळाली हाेती. त्यांनी भाजपचे विकास मठकरी यांचा पराभव केला हाेता. मठकरी यांना ३० हजार ३८८ मते मिळाली हाेती. तर मनसेचे रणजित शिराेळे यांनी २६ हजार १४३ मते घेेतली. तर २०१४ मध्ये माेदी लाट असताना भाजपचे विजय काळे या मतदारसंघातून विजयी झाले हाेते. काळे यांना ५६ हजार ४६० मते मिळाली हाेती, त्यांनी विद्यमान आमदार विनायक निम्हण यांचा २२ हजार ४७ मतांनी पराभव केला हाेता. निम्हण यांना ३४ हजार ४१३ मते मिळाली हाेती. त्यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस देखील निवडणुकीत उतरले हाेते. त्यांचे उमेदवार अनिल भाेसले यांना २४ हजार १७३ मते मिळाली हाेती. तर शिवसेनेचे मिलींद एकबाेटे यांना १४ हजार ६६२ मते, परशुराम वाडेकर यांना १५ हजार ४३० मते मिळाली हाेती.

या मतदारसंघात विराेधी मतांची विभागणी झाल्याने हा मतदारसंघ भाजपने जिंकला हाेता. २०१९ साली विद्यमान आमदार काळे यांना डावलत पक्षाने सिद्धार्थ शिराेळे यांना उमेदवारी दिली. मागील निवडणुकीत शिराेळे यांच्या विराेधात काॅंग्रेसचे दत्ता बहीरट हाेते. ही लढत दुरंगी झाली, पण यात शिराेळे यांनी पाच हजाराहून अधिक मतांनी विजय मिळविला हाेता. वंचित बहुजन आघाडीचे अनिल कुऱ्हाडे यांनी १० हजार ४५४ मते मिळविली, त्याचा फटका बहीरट यांना बसला. बहीरट यांना ५३ हजार ६०३ मते मिळाली हाेती. यावेळी विराेधी मतांचे विभाजन झाल्याचा फायदा भाजपला झाला.

दरम्यान या मतदार संघात कॉंग्रेस पेक्षा भाजपचा प्रचाराचा जोर दिसून येत आहे. शिरोळे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. खास करून झोपडपट्टी भागात देखील भाजपला समर्थन मिळताना दिसत आहे. खासकरून गोखले नगर परिसर, निलज्योती, माफ्को भागात शिरोळे यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अंतिम निकालाच्या वेळी भाजपला याचा किती फायदा मिळणार, हे पाहणे या निमित्ताने महत्वाचे ठरणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0