MLA Ravindra Dhangekar Vs Dheeraj Ghate | आमदार रवींद्र धंगेकर हवेने भरलेला फुगा | धीरज घाटे यांची टीका 

HomeBreaking Newsपुणे

MLA Ravindra Dhangekar Vs Dheeraj Ghate | आमदार रवींद्र धंगेकर हवेने भरलेला फुगा | धीरज घाटे यांची टीका 

कारभारी वृत्तसेवा Jan 09, 2024 2:31 PM

BJPs Ghar Ghar Chalo Sampark Abhiyan in pune | भाजपाच्या घर चलो संपर्क अभियानाचा पुण्यात शुभारंभ 
Prashant Jagtap Vs BJP | बिल्डरसाठी भाजपच्या आमदार व नगरसेवकांची नागरिकांना दमदाटी | राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप
Kasba by-election | कसबा पोटनिवडणूक सर्वांना सोबत घेऊनच जिंकणार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

MLA Ravindra Dhangekar Vs Dheeraj Ghate | आमदार रवींद्र धंगेकर हवेने भरलेला फुगा | धीरज घाटे यांची टीका

MLA Ravindra Dhangekar Vs Dheeraj Ghate | पुणे | काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Congress MLA Ravindra Dhangekar) आणि भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. आमदार धंगेकर यांनी भाजप नेत्यावर टीका केल्यानंतर घाटे यांनी देखील धंगेकर यांच्यावर टीका केली आहे. घाटे  म्हणाले, कायम ठेकेदारांच्या गराड्यात फिरणारे रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टी वर टीका केली. आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या वर टीका केली. मुळामध्ये जे स्वतः अधिकाऱ्यांना मारहाण करतात त्यांना आमच्या नेत्यावर बोलायचा नैतिक अधिकार नाही’ अशी प्रतिक्रिया भा ज पा चे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. (MLA Ravindra Dhangekar Vs Dheeraj Ghate)

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत घाटे बोलताना पुढे म्हणाले की ‘धंगेकर यांच्या कुठल्याही आरोपात तथ्य नाही. गुन्हेगारी मुक्त भयमुक्त वातावरण या साठी महायुतीचे सरकार वचनबद्ध आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना गुन्हेगारी मुक्त करण्याचे कठोर आदेश दिले आहेत. गृह खाते मोहोळ यांच्याविषयात योग्य ती कारवाई नक्कीच करेल. परंतु धंगेकर हे सवंग लोकप्रियतेसाठी अशी विधाने सातत्याने करत असतात. ते हवे ने भरलेला फुगा आहेत आणि हा फुगा लवकरच फुटेल त्यांना मुंगेरीलाल के हसीन सपने पडत आहेत. ज्यांनी आमच्या दिवंगत आमदार मुक्ताताई टिळक यांचा १० कोटींच्या कामाचा विरोध केला दुर्दैवाने तो निधी इतर ठिकाणी वळविला गेला. ज्यांना स्वतःच्या मातदारसंघातल्या जनतेची काळजी नाही. त्यांनी कोथरूड ची काळजी करावी हे खरोखर हास्यास्पद आहे. स्वतःची उमेदवारी जाहीर करून मोकळे झाले असे असले तरी आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा फाजील आत्मविश्वास हा नडणार आहे. चंद्रकांत दादा हे गेल्या साडेचार वर्षात मोहोळ यांना भेटले देखील नाहीत असे असताना धंगेकर यांनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य नाही’

यावेळी सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, पुनीत जोशी, वर्षा तापकीर, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले आदी उपस्थित होते