MLA Ravindra Dhangekar | कसबा मतदारसंघाचा निधी पर्वती मतदारसंघात वळवला | आमदार रविंद्र धंगेकर यांचा आरोप

HomeBreaking Newsपुणे

MLA Ravindra Dhangekar | कसबा मतदारसंघाचा निधी पर्वती मतदारसंघात वळवला | आमदार रविंद्र धंगेकर यांचा आरोप

Ganesh Kumar Mule Aug 29, 2023 10:58 AM

Nitin Gadkari Sabha in Kasba Pune | कसबा विधानसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन
Mohan Joshi | कसब्यातील काँग्रेसच्या विजयामुळेच झुकला भाजप | मोहन जोशी
Mahatma Gandhi | Lal Bahadur Shastri Jayanti | गांधीजी आणि शास्त्रीजी च्या जयंतीनिमित्त कसबा मतदार संघात १८६९ तुळस व गुलाब रोप वाटप

MLA Ravindra Dhangekar | कसबा मतदारसंघाचा निधी पर्वती मतदारसंघात वळवला | आमदार रविंद्र धंगेकर यांचा आरोप

 

कसबा मतदार संघातील (Kasba Vidhan Sabha) मूलभूत सोयी-सुविधा व विकासकामांसाठी उपलब्ध झालेला निधी, अचानकपणे पर्वती मतदार संघातील (Parvati Vidhan Sabha) कामांकरिता वळवण्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे. असा आरोप आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी केला आहे. निविदा प्रक्रियेपर्यंत आलेला निधी ऐनवेळी दुसऱ्या मतदारसंघाला देणे कसब्याच्या नागरिकांवर अन्याय करणारे आहे, असा आरोप करत मुख्यमंत्री, पालकमंत्री व नगरविकास विभागाने कसबा मतदारसंघाचा हा हक्काचा निधी पुन्हा कसब्याला द्यावा, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी पत्रकार परिषदेत केली.

रवींद्र धंगेकर म्हणाले, “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत कसबा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी १० कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. रस्ते, सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक, शौचालय दुरुस्ती, फुटपाथ, विसर्जन घाट, उद्यान विकास अशी जवळपास १०० विकासकामे प्रस्तावित होती. २० डिसेंबर २०२२ रोजी नगर विकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ही कामे मंजूर होऊन त्यासाठी १० कोटींचा निधी मान्य करण्यात आला होता.” (MLA Ravindra Dhangekar)

“मात्र, २७ जुलै २०२३ रोजी शासन निर्णय शुध्दीपत्रक काढून हा निधी कसबा मतदारसंघातील कामांऐवजी पर्वती 
मतदार संघामध्ये वळवण्यात आला. हा प्रकार कसबा मतदार संघातही जनतेवर अन्याय करणारा आहे. विकासकामामधे सत्ताधारी राजकारण करू पाहत आहे. कसब्यातील जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.  विरोधी पक्षातील आमदार असल्याने सत्ताधारी पक्षाकडून हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे की काय,  अशी शंका आमच्या मनात येत आहे. जाणूनबुजून कसबा मतदार संघाला डावलण्याचा हा प्रयत्न आहे.  जनतेवर होणारा अन्याय कदापि सहन करणार नाही. या शासन निर्णय बदल करुन पुन्हा कसबा मतदार संघाचा निधी परत द्यावा, अशी मागणी आम्ही करत आहोत,” असेही रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. (Kasba Consistency)

——-

News Title | MLA Ravindra Dhangekar | Funds of Kasba Constituency diverted to Parbati Constituency Allegation of MLA Ravindra Dhangekar