MLA Mukta Tilak | आमदार मुक्ता टिळक यांचे निधन | दुर्धर आजाराने होत्या ग्रस्त

HomeBreaking Newsपुणे

MLA Mukta Tilak | आमदार मुक्ता टिळक यांचे निधन | दुर्धर आजाराने होत्या ग्रस्त

Ganesh Kumar Mule Dec 22, 2022 10:56 AM

Ghanbhatta Varas Hakka Case | घाणभत्ता वारस हक्काची सुनावणी आता 12 जानेवारीला  ला
Pune PMC 32 Villages Committee | समाविष्ट 32 गावांच्या लोकप्रतिनिधींच्या समितीत अजून तीन सदस्य  | जाणून घ्या नवीन सदस्य  
Insurance For Warkari | वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण

आमदार मुक्ता टिळक यांचे निधन | दुर्धर आजाराने होत्या ग्रस्त

पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजपच्या (BJP) आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak) यांचे निधन झाले आहे. त्या अनेक दिवसांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या. गॅलक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital) त्यांनी  अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी उद्या सकाळी ९.०० ते ११.०० केसरी वाडा, राहत्या घरी ठेवण्यात येईल. अंत्यविधी वैकुंठ स्मशामभुमी येथे ११.००नंतर करण्यात येईल. (MLA Mukta tilak Passes away)

महापौर म्हणून चांगली कारकीर्द 

कसबा मतदार संघात (Kasaba constituency) त्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या होत्या. त्या आधी पुण्याच्या अडीच वर्ष महापौर होत्या. त्यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात नगरसेवक या पदावरुन केली. त्या चार वेळा पुणे महापालिकेत भाजपच्या नगरसेवक होत्या.महापौर म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. त्यांनी आपल्या पदावरून सर्वच पक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे विरोधक देखील त्यांचा आदर करत. (MLA Mukta Tilak)

भाजप संघटनेमध्ये त्यांनी विविध पदे भुषवली होती. दरम्यानच्या काळात झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी ऍम्ब्युलन्समध्ये जाऊन मतदान केले होते. त्यावेळी त्यांच्या पक्षनिष्ठेची मोठी चर्चा झाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांचे कौतुक केले होते. (BJP MLA Mukta Tilak)