Mangalagaur in Dubai, UAE | दुबई, यूएई मध्ये रंगला आगळा वेगळा मंगळागौरी चा कार्यक्रम

HomeBreaking Newssocial

Mangalagaur in Dubai, UAE | दुबई, यूएई मध्ये रंगला आगळा वेगळा मंगळागौरी चा कार्यक्रम

Ganesh Kumar Mule Sep 12, 2023 9:48 AM

Bibwewadi Hill Top Hill Slope | बिबवेवाडीतील डोंगरमाथ्याचे आरक्षण उठविण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती | शहरातून विरोध झाल्यानंतर राज्य सरकारचा निर्णय 
Mohan Joshi vs Chandrakant Patil : राहुल गांधींना उपदेश करण्यापेक्षा महागाईवर बोला : माजी आमदार मोहन जोशी यांचा आमदार चंद्रकांत पाटील यांना टोला
Pune : Corona : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली  : बुधवारी मिळाले 1805 पॉजिटीव्ह रुग्ण 

 Mangalagaur in Dubai, UAE | दुबई, यूएई मध्ये रंगला आगळा वेगळा मंगळागौरी चा कार्यक्रम

   Mangalagaur in Dubai, UAE |   ‘घे भरारी यूएई च्या मराठी मुली’ (UMM) या ग्रुप ने श्रावण महिन्यात १० सप्टेंबर २०२३ रोजी एक अविस्मरणीय अशी मंगळागौर स्पर्धा (Mangalagaur compétition) आयोजित केली होती. या कार्यक्रमाला यूएई तिल महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशी माहिती कार्यक्रमाच्या संचालिका डॉ अर्चना बोंडगे (Dr Archana Bondge) यांनी दिली.
     या स्पर्धेमध्ये यूएई मधील शारजा,दुबई, अबुधाबी, अजमान अशा वेगवेगळ्या भागातील 64 महिलांनी भाग घेतला आणि 400 हुन अधिक महिला उपस्थित होत्या.
 एकूण 8 संघ होते. हिरकणी, सुवासिनी,स्वामिनी, नारीशक्ती आम्ही नारी लयी भारी,श्रावणमासी हर्षमानसी, चला सखी खेळूया झिम्मा,अष्टसखी अशी या संघाची नावे होती. फुगडी, बसफुगडी,होडी, झिम्मा, कोंबडा,आगोटा पागोटा, पिंगा,गाठोडे, लोणी काढणे अशा वेगवेगळ्या खेळांचे उत्कृष्ट प्रदर्शन स्पर्धाकांनी केले.
   सुपडी, घागर, केरसुनी,लाटणे, तवा अशा गृहउपयोगी वस्तूंचा आणि इतर प्रॉप्स चा उपयोग करून बायकांनी अतिशय अवघड असे कसरतीचे प्रकार आणि खेळ दाखवले. आपल्या देशाच्या प्रगतीच्या आणि महान व्यक्ती च्या कहाण्या नृत्यातून लोकांपुढे मांडल्या.  भारताच्या चंद्रावरील आगमनाचा सुंदर अविष्कार पाहायला मिळाला. अशी ही महाराष्ट्राची थोर परंपरा आणि संस्कृती जपत यू.ए.ई मराठी मुलींच्या ग्रुप ने आपली एक अदभुत छाप पाडली. आणि मराठी अभिनेता पुष्कर जोग ह्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली.
    या स्पर्धेच्या संचालिका होत्या सौ. अमिता पाटील, सौ. अर्चना बोंडगे, सौ.विद्या अधिकारी, परिक्षक सौ. अदिती केळकर हाटे आणि सौ. वैशाली म्हैसाळकर यांनी निकाल जाहीर केले.
या कार्यक्रमाचे मुख्य प्रयोजक होते
1. Royal Purandar
2. Insejam Accounting services
3.JKV Forex trading
    या अनोख्या मंगळागौर स्पर्धेत पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी हिरकणी ग्रुप ने पटकवली. दुसऱ्या क्रमांकाचा मान नारीशक्तीला मिळाला आणि तिसऱ्या क्रमांकाचा विजेता होता सुवासिनी ग्रुप.
      या सगळ्या विजेत्या स्पर्धकांना
बॉण्ड बियोंड -Bond Beyond
सुपरगुडझ- Supergudz
प्रागणिक- Praagneek,  तर्फे पारितोषिक देण्यात आली.
   तसेच इतर स्पर्धाकांना रुबरु होम्स, ट्रस्ट मेडिकल लेबोरेटरी तर्फे बक्षिसे मिळाली. इतर प्रयोजक होते हेल्थझिया , पुरोहित फूड्स,पल्लवी सलून,चित्रकला – डॉ. सीमा, अपसायकल, सुवाज स्किन इसेनशियल
     ह्या कार्यक्रमाचे युट्युब प्रसारण भाग्यश्री चाळके आणि दीपाली डाके यांनी केले.  ह्या कार्यक्रमाचे फूड पार्टनर साई धाम व्हेज रेस्टॉरंट हे होते.
——
News Title | Mangalagaur in Dubai, UAE | A different Mangagouri event was staged in Dubai, UAE