Man-Hinjewadi-Shivajinagar Metro Project | माण – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन – ३ प्रकल्पास अर्बन इन्फ्रा ग्रुपकडून PPP मेट्रो प्रकल्प पुरस्कार
| रिनाज पठाण यांना मॉडर्न मेट्रो वुमन ऑफ द इयर पुरस्कार
Man-Hinjewadi-Shivajinagar Metro Project | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (PMRDA) राबविण्यात येत असलेल्या माण – हिंजवडी ते शिवाजीनगर (Metro Line-3) चे काम प्रगतीत असून सदर प्रकल्पास अर्बन इन्फ्रा ग्रुपकडून (Urban Infra Group) दिला जाणारा सन २०२३ चा सर्वात नाविन्यपूर्ण PPP मेट्रो प्रकल्प हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यासोबतच अर्बन इन्फ्रा ग्रुपकडून श्रीमती. रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पुमप्रविप्रा, पुणे यांना मॉडर्न मेट्रो वुमन ऑफ द इयर – २०२३ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर पुरस्कार सोहळ्यास प्राधिकरणाच्या वतीने रिनाज पठाण, मुख्य अभियंता, राजू ठाणगे, कार्यकारी अभियंता व दर्शन बंब, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. अशी माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली. (Man-Hinjewadi-Shivajinagar Metro Project)
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) माण-हिंजवडी-शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन – ३ मास रॅपिड ट्रान्झिट (Mass Rapid Transit) अंतर्गत या प्रकल्पाचे काम राज्य शासनाच्या मान्यतेने हाती घेतले आहे. सदर उन्नतमार्ग मेट्रो मार्गाची लांबी २३.२०३ कि.मी. असून सदर मार्गिकेत २३ स्थानके आहेत. केंद्र सरकारच्या मेट्रो रेल धोरण २०१७ अन्वये सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर संकल्पना करा, बांधा, अर्थ पुरवठा करा, चालवा आणि हस्तांतर करा (DBFOT) मॉडेल अंतर्गत राबविण्यात येत असलेला हा पहिला प्रकल्प आहे. श्री. राहुल महिवाल, मा. महानगर आयुक्त, पुमप्रविप्रा, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता श्रीमती. रिनाज पठाण या यशस्वीरीत्या पार पाडत असून माहे नोव्हेंबर-२०२३ अखेरपर्यंत मेट्रो लाईन – ३ प्रकल्पाचे भौतिक काम सुमारे ५१.१४% व आर्थिक उद्दिष्ट ४६.६८% पूर्ण झाले आहे.